उदयनराजेंनी दाबला शिवेंद्रसिंहराजेंचा खांदा (व्हिडिओ)

महेश बारटक्के
बुधवार, 2 जानेवारी 2019

कुडाळ (ता. जावळी) येथील एका मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी दोघे एकत्र आले. एकत्र आल्यानंतर दोघांनीही एकमेकांना हसतमुख हस्तांदोलन करीत शाब्दिक चिमटे काढले.

कुडाळ : खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील द्वंद्व उभ्या महाराष्ट्राला माहित आहे मात्र कुडाळ (ता. जावळी) येथील एका मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी दोघे एकत्र आले. एकत्र आल्यानंतर दोघांनीही एकमेकांना हसतमुख हस्तांदोलन करीत शाब्दिक चिमटे काढले.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचा खांदा दाबला असता शिवेंद्रसिंहराजे यांनीही मोठ्या मनाने दाद देत माझा सारखा खांदा का दाबताय असे विचारले. त्यावर दिलखुलासपणे उदयनराजेे यांनी फिटनेस बघत आहे, असा टोला मारला. तर शिवेंद्रसिंहराजे यांनीही चाणाक्ष पणे माझा फिटनेस कायमच चांगला असून कधीही प्रात्यक्षिक दाखवायची तयारी असल्याचा टोला लगावला. त्यानंतर दोघेही हसत हसत मार्गस्थ झाले.

Web Title: Conversation between Udayanraje Bhosale and Shivendrasinha Raje Bhosale