नोटबंदीच्या विरोधात 'सहकार'एकवटला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून नोटबंदीची झळ सोसणाऱ्या गावागावांतील सेवा-सोसाट्याच्या प्रतिनिधींनी सोमवारी (ता. 5) येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रशासनाने तातडीने इतर राष्ट्रीय बॅंकेला मिळणाऱ्या रक्कमेच्या तुलनेत जिल्हा बॅंकेलाही रक्कम द्यावी अन्यथा सोमवारी (ता.12) कोल्हापूर जिल्हा बंद करण्याचा इशारा यावेळी बॅकेच्या वतीने देण्यात आला. 

सकाळी अकरा वाजता दसरा चौक येथून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंकांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर कार्यलयातील प्रतिनिधींच्या सोबत जिल्हा बॅंकेचे संचालक व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. 
यावेळी दुध, ऊस बिले थकल्याने होणाऱ्या गैरसोयींचा पाढाच जिल्हा बॅंकेच्या संचालकांनी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यासमोर मांडला. ग्रामीण भागात भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा बॅंकेला पुरेसा निधी न दिल्याने ग्रामीण भागातील अर्थकारणच धोक्‍यात आले आहे. 

शेतकरी, शेतमजूरांच्या पोटा पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याने ग्रामीण भागात वाईट अवस्था निर्माण झाल्याने आमदार के.पी. पाटील व त्यांच्या सहकार्यांनी सांगितले. 

पुरेसा निधी नसल्याने जिल्हा बॅंका, सेवा सोसायट्या अडचणीत आल्या असल्याचे सांगून बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी या निर्णयाबददल नापसंती व्यक्त केली. जिल्हा प्रशासनाने तातडीने इतर बॅंकाना मिळणाऱ्या निधी इतकाच निधी आम्हालाही द्यावा, असे न झाल्यास सोमवारी जिल्हा बंद करु असा इशारा यावेळी दिला. मोर्चास जिल्ह्याती प्रत्येक गावांतील सेवासासोयाट्यांचे सहकारी ब:ँकाचे पदाधिकारी, सभासद सहभागी झाले .
 
Web Title: cooperation sector comes together against note ban, demonetisation

व्हिडीओ गॅलरी