वाळवा तालुक्‍यात पाच जणांना कोरोना 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 July 2020

मिरजेतील उपजिल्हा रुग्णालयामधील पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील एक 21 वर्षाचा बांधकाम कामगार पॉझिटिव्ह आला आहे.

इस्लामपूर (सांगली) : वाळवा तालुक्‍यात आज दुपारपर्यंत आणखी पाच जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी ही माहिती दिली. 

कामेरी (ता. वाळवा) येथे भुसावळ मधून आलेल्या एका पोलीसाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या घरातील 73 वर्षे वयाचे वडील आणि 63 वर्षीय आई तसेच 11 वर्षे वयाचा मुलगा असे तिघेजण आज पॉझिटिव्ह निघाले. इस्लामपूर शहराशी संबंधित एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

मिरजेतील उपजिल्हा रुग्णालयामधील पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील एक 21 वर्षाचा बांधकाम कामगार पॉझिटिव्ह आला आहे. तो मिरज येथील मूळ रहिवासी आहे. दरम्यान इस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावरील अभियंतानगर-पेठ मधील पॉझिटिव्ह आलेल्या एका व्यक्तीचा इस्लामपूर-शिवनगरमधील पंचवीस वर्षे वयाचा मित्र पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना इस्लामपूर येथील कोव्हिड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona to five people in Valva taluka