esakal | ॲपेक्सप्रकरणी सांगलीत तिरडी मोर्चा :87 कोरोना रुग्णांचा मृत्यू; भाजप आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

ॲपेक्सप्रकरणी सांगलीत तिरडी मोर्चा : 87 कोरोना रुग्णांचा मृत्यू

ॲपेक्सप्रकरणी सांगलीत तिरडी मोर्चा : 87 कोरोना रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : आज महापालिकेच्या महासभेत मिरजेतील( Miraj Apex Hospital)ॲपेक्स कोरोना हॉस्पिटलमधील ८७ कोरोना (Corona)रुग्णांच्या बळीचे तीव्र पडसाद उमटले. भाजप सदस्य तिरडी घेऊन महासभेत घुसले. आयुक्त नितिन कापडणीस (Commissioner Nitin Kapdanis)यांच्या चौकशीची मागणी करीत सदस्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मारला. पोलिसांना हस्तक्षेप करीत सदस्यांना सभागृहाबाहेर काढावे लागले.मिरजेच्या ॲपेक्स केअर हॉस्पिटलमधील 87 कोरोना रुग्ण मृत्यूप्रकरणी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहेत. (corona-patients-died-case-apex-hospital-sangli-bjp-party-worker-aggressive-tirdi-agitation-akb84)

रुग्णालयाला परवानगी देणाऱ्या आयुक्त व पालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली. पहिल्या लाटेत तक्रारी असूनही दुसऱ्या लाटेत या  रूग्णालयाला परवानगी दिलीच कशी हा मुद्दा उपस्थित करीत आधी आयुक्तांवर कारवाईचा आग्रह धरण्यात आला. महासभेआधीच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महासभा सुरू असताना पालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन करत प्रतीकात्मक तिरडी ठेवून आंदोलन केले .

हेही वाचा: जावयाचा सासरवाडीत धिंगाणा; कोयत्याने महिलेवर सपासप वार

जोरदार घोषणाबाजी सुरु होती. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत चौकशी करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गजानन मगदुम, भाजपचे नेते दिपक माने यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

loading image