esakal | जावयाचा सासरवाडीत धिंगाणा; कोयत्याने महिलेवर सपासप वार
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

जावयाचा सासरवाडीत धिंगाणा; कोयत्याने महिलेवर सपासप वार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : भरदिवसा गावभाग पोलीस ठाण्यानजीक असलेल्या लाल नगर भागात नंग्या कुऱ्हाडी, कोयते नाचवत तरुणांच्या टोळीने हल्ला केला. या हल्ल्यात एका वृद्ध महिलेसह एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी हातकणंगले (Hatkangale) ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरदिवसा मुख्य वर्दळीच्या मार्गावर अचानकपणे झालेल्या या हल्ल्यामुळे या भागात भितीचे वातावरण पसरले आहे. हल्लेखोर पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. यावेळी जखमी वृध्द महिलेने न्यायासाठी पोलिस स्टेशन गाठले..

हेही वाचा: ना नफा, ना तोटा; मुस्लिम बांधवांसाठी बकऱ्यांचा पुरवठा

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,

लाल नगर भागातील एका मुलीचे नजीकच्या आवळे गल्लीतील एका मुलाशी काही दिवसांपूर्वी लग्न झाले होते.सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास या जावयाने सासरवाडीत येवून नंग्या कोयता, कुऱ्हाडी दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनतर टोळक्याने एका वृद्ध महिलेच्या मांडीवर कोयत्याने वार केला तर समजावण्यासाठी आलेल्या एका तरुणाच्या हात व छातीवर कुऱ्हाडीने वार केला आहे. गावभाग पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला. पसार झालेल्या हल्लेखोराचा पोलीस शोध घेत आहेत. नातेवाईकांनी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली आहे.

loading image