सांगलीत 'या' आमदाराला कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 August 2020

संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी स्वतः विलगिकरण करून घ्या

कडेगाव : जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार मोहनराव कदम यांचा कोरोना आज दुपारी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी त्यांचे नातू व युवा नेते जितेश, मुलगा हणमंत कदम आणि स्नुषा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र आज आमदार मोहनराव कदम यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पलूस-कडेगावसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा - सांगलीत कोरोना रूग्णांवर उपचारासाठी 400 खाटांचे हॉस्पीटल लवकरच उभारणार : जयंत पाटील 

मोहनराव कदम यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत त्यांची प्रकृती ठणठणीत असून ते लवकरच कोरोनावर मात करून घरी परत येतील असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आणि कुटुंबियांकडून व्यक्त केला जात आहे. त्यांच्या जवळच्या तसेच संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी स्वतः विलगिकरण करून घ्यावे. कोरोना सबंधित लक्षणे दिसत असतील तर कोरोना चाचणी करून घ्यावी असे अवाहन कदम कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive report of sangli MLA mohanrao kadam