अन् कुडचीतील आजोळ झाले सीलडाऊन.. ! 

Corona to  small girl  and Four quarantine in Aurwad
Corona to small girl and Four quarantine in Aurwad
Updated on: 

रायबाग  (बेळगाव) : कोरोनामुळे तालुक्यातील कुडची शहर चांगलेच चर्चेत आले आहे. अशातच येथे राहून गेलेल्या महाराष्ट्रातील औरवाडच्या बालिकेला कोरोनाची बाधा झाल्याने कुडचीतील तिचे आजोळच सीलडाउन झाले. तसेच येथील चार जणांना क्वारंटाइन देखील करण्यात आले.


याबाबत अधिक माहिती अशी

 महाराष्ट्रातील औरवाडची बारा वर्षीय बालिका कुडची येथे आजोळी आली होती. लॉकडाउन काळात ती येथील बिलाल मस्जिद परिसरात राहिली होती. १७ मे रोजी बालिका औरवाड येथे गेली. तिला तिथे क्वारंटाइन करून स्वॅबचे नमुने घेतले होते. वैद्यकीय अहवाल आल्यावर तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. तिच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला असता हे कनेक्शन कुडचीपर्यंत निघाले. येथून गेलेल्या बालिकेला कोरोना झाल्याचे समजताच कुडची येथील बिलाल मस्जिद परिसर सीलडाउन करण्यात आला. तसेच संपर्कात आलेल्या चार जणांना क्वारंटाइन केले आहे. त्याच बरोबर येथील बंदोबस्त वाढविला असून आरोग्य खात्याचे अधिकारी, कर्मचारी व आशा कार्यकर्त्या लक्ष ठेवून आहेत.

नागरिकांनी घेतली धास्ती

कुडची येथून महाराष्ट्रात गेलेल्या बालिकेला कोरोना झाल्याने येथे सीलडाउनसह चार जण क्वारंटाइन झाले. त्याची धास्ती शहरातील नागरिकांनी घेतली आहे. आता पुढे आणखी कसे परिणाम दिसणार, याची चिंता नागरिकांना लागली आहे.

'कुडची शहर कोरोनामुळे त्रस्त झाले आहे. मात्र नागरिकांनी घाबरू नये. ज्यांना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे दिसतात, त्यांनी आरोग्य खात्याची त्वरित संपर्क साधून बचाव करून घ्यावा.'
-डॉ. सतीश कलट्टी,आरोग्य अधिकारी, कुडची समुदाय आरोग्य केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com