esakal | कोरोना व्हायरस ः इंदोरीकरमहाराजांनी दिली लाखमोलाची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

indorikar maharaj donation

इंदोरीकरमहाराज यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय मोठे वादंग उठले होते. त्यांच्या सामाजिक योगदानाचा आणि कीर्तनातील देणगीचाही मुद्दा समोर आला होता. इंदोरीकर महाराज हे स्वतः शाळा चालवतात. विद्यार्थ्याकडून एक रूपयाही न घेता त्यांची ही समाजसेवा सुरू आहे.

कोरोना व्हायरस ः इंदोरीकरमहाराजांनी दिली लाखमोलाची मदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोले: देशात व राज्यात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. या भयावह कोरोनालढ्यात काही लोकांचा जीवदेखील गेला तर काही या आजाराने बाधित झाले आहेत. कोरोनाविरोधात लढ्यासाठी राज्य सरकारने सर्वच क्षेत्रातील लोकांना मदतीचे आवाहन केले आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत राजकारण, मनोरंजन क्षेत्रातील मंडळींसह प्रसिद्ध मराठी कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनीदेखील कोरोनाविरोधात लढ्यात सामाजिक बांधिलकी जपत हातभार लावला आहे.

इंदुरीकर महाराजांनी या कोरोना लढा आणि कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. इंदुरीकर महाराजांनी बुधवारी संगमनेर तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे एक लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द केला. मुख्यमंत्रई सहायता निधीत त्यांनी ही रक्कम दिली आहे.

यावेळी तहसीलदार अमोल निकम,गटविकास अधिकारी सुरेश शिंदे व हभप शालिनीताई महाराज देशमुख उपस्थित होत्या.

इंदोरीकरमहाराज यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय मोठे वादंग उठले होते. त्यांच्या सामाजिक योगदानाचा आणि कीर्तनातील देणगीचाही मुद्दा समोर आला होता. इंदोरीकर महाराज हे स्वतः शाळा चालवतात. विद्यार्थ्याकडून एक रूपयाही न घेता त्यांची ही समाजसेवा सुरू आहे. व्यसनमुक्तीसाठीही त्यांचं काम सुरू आहे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लाखमोलाची देणगी दिली आहे.

loading image