Video : 'त्या' ठणठणीत अन् घरी परतल्याही; नवीन 18 संशीयत दाखल

Video : 'त्या' ठणठणीत अन् घरी परतल्याही; नवीन 18 संशीयत दाखल
Updated on: 

सातारा : सातारा जिल्ह्यातील पहिली कोरोना (कोविड 19 ) बाधित महिला नुकतीच ठणठणीत बरी झाली. कोरोना मुक्त जिल्ह्यातली पहिल्या रुग्णास आज जिल्हा रुग्णालयातून आराेग्य कर्मचारी यांनी पुष्प गुच्छ देवून आणि टाळ्या वाजवून घरी जाताना निरोप दिला. संबंधित कोरोना मुक्त महिलेने रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स यांचे यावेळी आभार मानले. 

सातारा जि्ह्यात काेराेना संशीयत रुग्णांची वाढ हाेत आहे. काेराेना बाधित महिलेस 22 मार्चला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. त्यानंतर 23 मार्चला त्यांना काेराेना झाल्याचे निष्पन्न झाले हाेते. त्यांच्यावर उपचार सुरु हाेते. त्यांचे 14 आणि 15 व्या दिवशी पुन्हा नमुने पाठविण्यात आले. ते दाेन्ही निगेटीव्ह आले. आज (बुधवार) सकाळी त्यांना ठणठणीत बरे झाल्याने जिल्हा रुग्णालयातून त्यांना घरी साेडण्यात आले. 

हा निरोप देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर, सहायक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माने, डॉ.धुमाळ, डॉ. बक्षी,  डॉ. जाधव, डॉ. देशमुख, डॉ.सुपेकर, डॉ.हिरास,  मेट्रोन श्रीमती चव्हाण यांच्या नर्सिंग स्टाफ, तांत्रिक विभागाचे कर्मचारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी याचे  कौतुक करून अभिनंदन केले आहे.


दरम्यान सातारा जिल्ह्यात सहा एप्रिल रोजी रात्री उशिरा दाखल असलेल्या 32 अनुमानित रुग्णांचे व सात एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या सात अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट एन.आय.व्ही. पुणे यांनी निगेटिव्ह आले आहेत.

अकराव्या वाढदिनाचा खर्च सियाने पाठविला पंतप्रधान निधीस 

जिल्हा रुग्णालय सातारा येथे 1 ते 60 वर्ष वयोगटातील 18 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 1 ते 55 वयोगटातील पाच नागरिक (दोन पुरुष व तीन महिला) हे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे व 20 ते 60 वर्ष वयोगटातील 13 नागरिक कोविड-19 बाधीत रुग्णाचे निकट सहवासित आहेत. या सर्व रुग्णांचे घशातील स्त्रावाचा नमुने  एन. आय. व्ही. पुणे  येथे  पाठविण्यात आले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli District Bank Election
Koyna Dam water reuse project Maharashtra
Shiv Sena UBT leaders Belagavi entry ban November 1 2026
Harshada Deshmukh-Jadhav election victory