esakal | सातारा : चिलीवरुन आलेला युवक जिल्हा रु्गणालयात दाखल

बोलून बातमी शोधा

सातारा : चिलीवरुन आलेला युवक जिल्हा रु्गणालयात दाखल

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खबरदारीचे उपाय म्हणुन बाजारपेठेतील जीवनावश्यक सेवेची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आवश्यक सेवा वगळता अन्य दुकाने सोमवार व गुरुवारीच सुरु राहतील अशी माहिती जिलहा प्रशासनातील अधिकारी यांनी दिली.

सातारा : चिलीवरुन आलेला युवक जिल्हा रु्गणालयात दाखल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : चिली या देशातून प्रवास करुन आलेल्या सातारा जिल्ह्यातील 34 वर्षीय युवकाला येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात कोविड-19 चा अनुमानित रुग्ण म्हणून आज (शनिवार) दाखल करण्यात आले आहे. त्याला सर्दी असल्याने सध्या विलगीकरण कक्षात ठेवले असून प्राथमिक तपासण्यानंतर त्याची प्रकृती स्थिर आहे.

त्याच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तथापी कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी तसेच वेळोवेळी प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशाचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

सातारा : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यसाठी प्रतिबंधात्मक अपाययोजनेचा एक भाग म्हणून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897  खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 25 मधील पोटकलम 2(अ) नुसार  अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी सातारा शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, धाबे, रिसॉर्ट, फार्म हाऊस, रेस्टॉरंट, लॉजिंग, आईस्क्रीम पार्लर, सर्व प्रकारची शीत पेयांचे गाडे व दुकाने (उदा. चहा वडा/भजी पाव, चायनीज, पाणी पुरी इत्यादी सर्व ) दि. 31 मार्च 2020 अखेर पूर्ण पणे बंद करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्या संबंधितांवर  आपत्ती  व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Coronavirus : त्यांचा अहवाल आला; सातारकरांनाे आता सर्व काही तुमच्यावरच अवलंबून

Video : सातारा जिल्ह्यातील दुकानदारांसाठी महत्वाची बातमी

मुंबई : कोरोनाचे संकट मोठे असून त्याचा सर्वांनी मिळून मुकाबला करायचा आहे. रोगाचे संक्रमण पूर्णत: बंद करण्यासाठी शासनाने सार्वजनिक ठिकाणी लोकांनी येऊ नये तसेच घरीच राहावे असे आवाहन केले आहे, त्याचा फटका दैनंदिन रोजीरोटी कमावणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांना बसू नये व त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून राज्याच्या कामगार विभागाने तशी विनंती सर्व कारखाने व व्यवसायांना केली आहे. 

शाब्बास रे पठ्ठया ! चालत्या ट्रेनमधून उडी मारुन चाेरट्यास पकडले

यासंदर्भात कामगार आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांनी राज्यातील सर्व कामगार उपायुक्त, सहायक आयुक्त, कामगार अधिकारी यांना त्यांच्या अखत्यारीतील माथाडींसह सर्व खासगी व सार्वजनिक आस्थापनांनी कोणत्याही तात्पुरत्या किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यास नोकरीवरून काढून टाकू नये किंवा त्यांच्या वेतनात कपात करू नये अशा स्वरूपाची  विनंती करण्यास सांगितले आहे. 

जरुर वाचा : Coronavirus: संसर्गाची साखळी तोडा

सर्व आस्थापनांनी, कंपन्यांनी या आव्हानात्मक परिस्थितीत शासनास सहकार्य करावे तसेच एखाद्या कर्मचाऱ्याने या कालावधीत रजा घेतली असल्यास त्याचे वेतन कापू नये अशी विनंतीही करण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्यास ते ठिकाण बंद करावे लागेल अशा परिस्थितीत तेथील कामगार व कर्मचारी कामावर आहेत असेच समजण्यात यावे. या स्थितीत एखाद्यास कामावरून कमी केले तर ती व्यक्ती आणि त्याचा परिवार एवढ्यावरच आर्थिक परिणाम होणार नाहीत तर एकूणच या साथ रोगाविरुद्ध त्याचे मनोधैर्य खचू शकते आणि याचा  व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही असेही डॉ कल्याणकर यांनी दिलेल्या पत्रांत म्हटले आहे.

हेही वाचा : कोरोनासोबतच्या लढतीत मदत करतंय गुगलचं 'हे' भन्नाट फिचर...