कोरोनासोबतच्या लढतीत मदत करतंय गुगलचं 'हे' भन्नाट फिचर..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

गुगलने 'गुगल टाईमलाईन' नावाचं फिचर लाँच केलं आहे. यात तुम्ही  स्वतःची  ट्रॅव्हल हिस्ट्री बघू शकणार आहात. 

मुंबई : जगात कोरोनाचा प्रभाव आणि त्यामुळे नागरिकांमधील चिंता वाढताना पाहायला मिळतेय. भारतातही कोरोनाचे २८० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालली आहे. केंद्र सरकार आणि सर्व राज्यांचं सरकार कोरोनाला आळा घालण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत. मात्र आता गुगलनं  तुमच्यासाठी एक भन्नाट फिचर आणलं आहे. ज्यामुळे तुम्ही कोरोनापासून तुमचा बचाव करू शकणार आहात.   

सावधान ! महाराष्ट्रात एका दिवसात वाढलेत कोरोनाचे ११ रुग्ण.. अजूनही बाहेर पडत असाल तर आत्ताच थांबा... 

कोरोना पसरण्याचं प्रमुख कारण म्हणजे इतर देशातून कोरोना घेऊन आलेली लोकं. त्यामुळे विमानतळांवर प्रत्येकाची ट्रॅव्हल हिस्ट्री बघितली जातेय. मात्र असे अनेक लोकं आहेत जे आपली ट्रॅव्हल हिस्ट्री लपवत आहेत. अशात आता काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री शोधायला सुरुवात केली आहे. त्यासाठी गुगलनं 'गुगल टाईमलाईन' नावाचं फिचर लाँच केलं आहे. यात तुम्ही  स्वतःची  ट्रॅव्हल हिस्ट्री बघू शकणार आहात. 

काय आहे गुगल टाईमलाईन:

गुगल मॅप्सचा वापर करून आपण कुठं प्रवास केला याची माहिती मिळते.

कोणत्या दिवशी किती वाजता कोणत्या ठिकाणी होतो याच्या डिटेल्स यावरून मिळतात.

या तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्याच्या प्रवासाची माहिती मिळू शकते.

तुम्ही ज्या ठिकाणी जाता देता ती सर्व माहिती गुगल साठवते.

प्रत्येक अपडेट ठिकाणाचं नाव आणि वेळ गुगलकडे सेव्ह होते.

यासाठी तुमच्या मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून जीमेल लॉगइन करावं लागेल.

त्यावर तुम्ही वर्ष, महिना, तारीख टाकून त्या दिवसभरात कुठे गेला होतात याची माहिती मिळेल. 

मोठी बातमी : अशा लोकांना काय बोलावं; थायलंडहून परतले, अन्‌ कच्छ एक्‍स्प्रेसने केला धोकादायक प्रवास...
 

अशी बघा ट्रॅव्हल हिस्ट्री :

  • गुगल मॅप ओपन केल्यानंतर वरती उजव्या कोपऱ्यात प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा. 
  • त्यात अनेक पर्याय दिसतील.
  • त्यावर 'Your Timeline' असा पर्याय दिसेल. 
  • टाईमलाईनवर क्लिक करा तुम्हाला दिवस, ठिकाण, शहर यानुसार पर्याय दिले जातील.
  • हे पर्याय निवडून तुम्ही ट्रॅव्हल हिस्ट्री शोधू शकता. 
  • याचा वापर करून तुम्ही दिवसाप्रमाणे ट्रॅव्हल हिस्ट्री शोधू शकता.  

Google launched new feature named google timeline to search travel history read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google launched new feature named google timeline to search travel history read full story