इचलकरंजीतील 'हे" आजी-माजी नगरसेवक शिवसेनेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

इचलकरंजी - मुंबईत "मातोश्री"वर आज येथील आजी-माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या सर्वांना शिवबंधन बांधले. यामध्ये ताराराणी आघाडीचे नगरसेवक रविंद्र माने, रवींद्र लोहार यांचा प्रामुख्यांने समावेश आहे. 

इचलकरंजी - मुंबईत "मातोश्री"वर आज येथील आजी-माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या सर्वांना शिवबंधन बांधले. यामध्ये ताराराणी आघाडीचे नगरसेवक रविंद्र माने, रवींद्र लोहार यांचा प्रामुख्यांने समावेश आहे. 

या शिवाय माजी नगरसेवक महेश ठोके, भाऊसाहेब आवळे, माजी नगरसेविका गीता जगताप यांच्यासह इंटक प्रणित पालिका कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. शिवसेनेत दाखल झालेले सर्वजण पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी होते. माने गटाचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची शहरातील राजकारणात ओळख आहे.

खासदार धैर्यशील माने यांच्या लोकसभा निवडणूकीतील विजयानंतर गेल्या अनेक दिवसांपासून या सर्वांच्या पक्षप्रवेशाची चर्चा होती. आगामी विधान सभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षप्रवेशाचा तातडीने निर्णय झाला. त्यानुसार आज "मातोश्री"वर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. 

पक्षप्रवेशावेळी खासदार धैर्यशील माने, विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरविंद दुधवडकर, उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, मलकारी लवटे, शहर प्रमुख सयाजी चव्हाण, नगरसेविका उमा गौड यांच्यासह शिवेसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थीत होते.

शिवसेनेची ताकद वाढणार
शहरात शिवसेनेची ताकद मर्यादीत होत चालली होती. मात्र हळूहळू शिवसेनेत पक्षप्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात शिवेसनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corp orators from Ichalkaranji Palika enters in Shivsena