टकाटक आरोग्यवर्धिनी रुग्णालयांमुळे मिरजकर समाधानी

आरोग्य अधिकारी आणि त्यांचे सहकारी स्थानिक नागरिकांसाठी देवदूत
टकाटक आरोग्यवर्धिनी रुग्णालयांमुळे मिरजकर समाधानी

मिरज : मिरज शहराच्या चार बाजूस असलेली महापालिकेची आरोग्यवर्धिनी योजनेतील रुग्णालये एकदम टकाटक आणि खरोखर त्या त्या परिसरातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने आरोग्यवर्धिनी ठरली आहेत. या चारही उपकेंद्रांमधील आरोग्य अधिकारी आणि त्यांचे सहकारी स्थानिक नागरिकांसाठी देवदूत बनले आहेत.

या सर्वांचे संख्याबळ आणि साधनसामग्री तितकीशी नसतानाही त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवेमुळे या चारही केंद्रांच्या आसपासचे हजारो नागरिक समाधानी आहेत. सध्या तर या चारही केंद्रांवर नियमित रुग्णांची तपासणी, कोरोनाचे लसीकरण, रॅपिड अँटिजेन, ‘आरटीपीसीआर’साठी स्वॅब नमुने घेणे, गरोदर महिलांची तपासणी, त्यांचे लसीकरण, त्यांच्यासाठी सोनोग्राफी सेवा आणि महालॅबच्या सर्व तपासण्या अशा किमान दहा ते अकरा प्रकारच्या सेवा रुग्णांना पूर्णपणे मोफत दिल्या जातात. किमान ७० हजार लोकसंख्येला किमान आरोग्य सुविधा तरी ही उपकेंद्रे पुरवत आहेत.

टकाटक आरोग्यवर्धिनी रुग्णालयांमुळे मिरजकर समाधानी
कोरोनाने आरोग्य यंत्रणेला जाग; लोकांकडून लाखोंची करवसुली अन् दवाखाने सात

येथे प्रत्येकी जास्तीत जास्त नऊ ते दहाच कर्मचारी आहेत आणि हे सगळे किमान अकरा प्रकारच्या सेवा देत असतात. गल्लीबोळात पेव्हिंग ब्लॉक बसवणे, खड्डे बुजवणे यांसारख्या कामांमध्ये स्वारस्य दाखविणाऱ्या महापालिकेतील कारभाऱ्यांनी या रुग्णालयांमधील कर्मचारी आणि डॉक्‍टरांची संख्या वाढविली तर नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळतील.

उपकेंद्रांची ठिकाणे

  • मालगाव रस्ता इंदिरानगरनजीक

  • श्रावणी पार्क, कोल्हापूर रोड

  • समतानगर

  • इदगाहनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com