कापूस नागपूरला विकला अन ट्रक दिला पेटवून अन आता..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

श्रीगोंदे : चिखली घाटात काही दिवसांपूर्वी जळालेल्या ट्रकचे गूढ उकलले आहे. फिर्याद देणारा ट्रकचालकच आरोपी निघाला. इतर साथीदारांच्या मदतीने ट्रक पेटवून, त्यातील कापूस नागपूरला त्यांनी विकल्याचे समोर आले. शाहरुख सिजाउद्दीन मन्सूरी (रा. सेंधवा, मध्य प्रदेश), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

अधिक माहिती अशी : चिखली घाटात कापूस घेऊन जाताना लागलेल्या आगीत ट्रकसह (एमपी 9 एचजी 4877) सर्व मुद्देमाल जळाल्याची तक्रार शाहरुख मन्सूरी याने 11 फेब्रुवारी रोजी बेलवंडी पोलिस ठाण्यात दिली होती. आगीत 22 लाख 93 हजार रुपयांच्या कापसाच्या 125 गाठी जळाल्याचे तक्रारीत नमूद केले होते. 

पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी घटनास्थळी भेट दिल्यावर, फिर्यादी खोटे बोलत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली; मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र, पोलिसांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे तो जास्त काळ टिकला नाही. मित्राच्या मदतीने विमा मिळण्यासाठी ट्रक जाळल्याची कबुली त्याने दिली. शाहरुख कयूम मन्सूरी याने हा सर्व बनाव रचल्याचे समोर आले. 

दरम्यान, ट्रक जाळण्यापूर्वी त्यातील कापूस गुहा (राहुरी) येथील एका ढाब्यावर दुसऱ्या ट्रकमध्ये भरला. पहिल्या ट्रकमध्ये कागदाची खोकी भरून चिखली घाटात चहूबाजूंनी पेट्रोल ओतून तो पेटवून दिला. ट्रक पूर्ण जळाल्यावर चालकाने नगर येथील नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर तो बेलवंडी पोलिस ठाण्यात दाखल झाला. 

दरम्यान, गुहा येथून कापसाच्या गाठी भरून तो ट्रक नागपूर येथील पुरोहित अँड कंपनीकडे खाली केला. बेलवंडी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन नागपूर गाठले. तेथे पोलिसांनी कापसाच्या गाठी जप्त केल्या. गुन्ह्यात वापरलेला दुसरा ट्रकही जप्त केला. पोलिसांनी या गुन्ह्यात 37 लाख 93 हजार 95 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपअधीक्षक संजय सातव, पोलिस निरीक्षक अरविंद माने, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, संभाजी शिंदे, दादासाहेब क्षीरसागर, संतोष धांडे यांनी तपास केला. 

गुन्ह्याचा "सेंधवा पॅटर्न' 
ट्रक जाळून विमा कंपनीकडून रक्कम उकळायची, त्यानंतर ट्रकमधील माल इतरत्र विकायचा, ही पद्धत "सेंधवा पॅटर्न' म्हणून देशात प्रसिद्ध आहे. या गुन्ह्यात सात ते आठ आरोपींचा सहभाग असून, या टोळीने आणखी कुठे गुन्हे केले आहेत, याचा शोध सुरू आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton was sold to Nagpur and then burnt by truck