नगरसेवक समद खान जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

नगर : मोहरम व गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांना धक्काबुक्की करून पसार झालेला नगरसेवक समद वहाब खान (रा. मुकुंदनगर) याला भिंगार पोलिसांनी आज पहाटे मुकुंदनगर परिसरातून अटक केली.

नगर : मोहरम व गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांना धक्काबुक्की करून पसार झालेला नगरसेवक समद वहाब खान (रा. मुकुंदनगर) याला भिंगार पोलिसांनी आज पहाटे मुकुंदनगर परिसरातून अटक केली.

अधिक माहिती अशी की, गणेशोत्सव व मोहरमच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या साडेतीनशेहून अधिक जणांना सहा दिवसांसाठी शहरबंदी करण्यात आली होती. शहरबंदी घोषित केल्यानंतरही शहरात फिरत असलेल्या व्यक्तींचा शोध घेत असताना समद खान हा मुकुंदनगर येथील त्याच्या राहत्या घरी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, कर्मचारी अजय नगरे यांच्या पथकाला आढळून आला.

त्या वेळी पोलिसांनी त्याच्या घराभोवती सापळा लावला असता खान याच्या घराशेजारी एक पांढरी कार उभी असल्याचे त्यांना दिसले. त्या कारमध्ये नगरसेवक खान बसला होता. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या वेळी पोलिसांना धक्काबुक्की करून तो पळून गेला होता. त्यानंतर रात्री भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात समद खान याच्यासह दोघांविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. तेव्हापासून खान पसार होता.

दरम्यान, आज पहाटे तो पुन्हा मुकुंदनगर येथील त्याच्या घरी येणार असल्याची माहिती भिंगार पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, सहायक फौजदार राजेंद्र गायकवाड, पोलिस हेडकॉन्स्टेबल, राजेंद्र सुद्रीक यांना मिळाली. त्यांच्या पथकाने आज पहाटे सापळा लावून खान यास अटक केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Councilor Samad Khan arrested