बॅंक निवडणुकीत सर्व मतपत्रिका एकत्र करूनच मतमोजणी ;निळकंठ करे : Sangli Bank Elections | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli district bank election

बॅंक निवडणुकीत सर्व मतपत्रिका एकत्र करूनच मतमोजणी ; निळकंठ करे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्हा बॅंकेच्या (Bank Elections) निवडणुकीत मतदारानी कोणत्याही अमिषाला व दबावाला बळी पडू नये. निर्भयपणे मतदान करावे. कोणी कोणाला मतदान केले. प्रत्येक तालुक्यात कोणाला किती मते पडली याची माहिती समजणार नाही. मतदारांची गोपनियता पाळली जाईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे (Nilkantha Kare)यांनी दिली.

जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत रविवारी मतदान होत आहे. विकास सोसायटी गट सोडून अन्य गटातील उमेदवारांना जिल्ह्यातून मतदान होणार आहे. प्रत्येक तालुक्यात किती मतदान झाले हे मजमोजणीत समजणार असल्याचे सांगत काही उमेदवारांकडून मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. पतसंस्था, प्रक्रिया, औद्योगिक, गृहनिर्माण, मजुर, बॅंका आदि सहकारी संस्थातील मतदारांची प्रत्येक तालुक्यात मर्यादीत संख्या आहे. तालुक्यातून उमेदवार निहाय मतदान समजल्यास कोणत्या संस्था गटातून कोणाला किती मतदान झाले हे उघड होणार असल्याचे सांगत मतदारांवर दबाव टाकला जात आहे. 

हेही वाचा: शेतकर्‍यांना मोठा दिलासा: हलगा-मच्छे बायपासला न्यायालयाची स्थगिती

याबाबत करे म्हणाले, " गट अ मध्ये त्या-त्या तालुक्यातील संस्था मतदार मतदान करणार आहेत. महिला राखीव, अनुसुचित जाती जमाती, ओबीसी व भटक्यात जाती जमाती या मतदार संघासह गट क १ ते ४ मधील उमेदवारांना संपूर्ण जिल्ह्यातील संस्था मतदार मतदान करतील.

मतमोजणी वेळी या गटातील सर्व मतपत्रिका एकत्र करून त्याचे गठ्ठे बांधले जातील. नंतर ते टेबल निहाय मोजले जातील. जिल्ह्यातील सर्वच मतपत्रिका एकत्र होणार असल्यामुळे विकास सोसायटी सोडून अन्य गटातील कोणत्याही उमेदवारास कोणत्या तालुक्यातून, कोणत्या संस्था गटातून किती मतदान झाले हे कळणार नाही. जिल्ह्यातीत एकूण मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भय वातावरणात मतदान करावे. मतदारांची गोपनीयता शंभर टक्के पाळली जाणार आहे. 

...तर मत बाद होणार

मतदारांनी मतदान करताना गोपनियता बाळगली पाहिजे. मतदाराने गोपनियतेचा भंग करत मतपत्रीका केंद्रातील अन्य कोणाला दाखवण्याचा प्रकार घडल्यास ती मतपत्रीका केंद्राध्यक्षांकडे जमा केली जाईल. संबंधित मत बाद करण्यात येईल. प्रत्येक मतदान केंद्रात व्हिडीओ कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे श्री. करे यांनी सांगितले.

loading image
go to top