देश संकटात; मोदींचे दुबळे समर्थन - चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

कऱ्हाड -  देश मोठ्या संकटात आहे. मात्र, तो चांगला चालला आहे, असे दुबळे समर्थन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. कर्नाटकात कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल. भाजपत तेथे अस्वस्थता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नोटाबंदीचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात ही वस्तुस्थिती मान्य केली आहे. तरीही पंतप्रधानांकडून देश चांगला चालला आहे, असे सांगितले जात आहे. त्यांचे ते समर्थन दुबळे आहे, असे सांगून 

श्री. चव्हाण म्हणाले, ""बुलेट ट्रेनला एक लाख कोटी दहा लाखांच्या आसपास खर्च आहे. ती रक्कम कशी ठरली, त्याची निविदा कोठे निघाली, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. मुंबई-अहमदाबादऐवजी मुंबई-नागपूर अशी बुलेट ट्रेन का सुरू करत नाहीत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मोदी किंवा राज्य सरकारकडे नाहीत. देशात भ्रष्टाचारामुळे भाजप बॅकफुटवर आहे. पारदर्शकता दाबून भ्रष्टाचाराला बळ दिले जात आहे. त्यामुळे देशाची स्थिती बिकट आहे.'' 

कर्नाटकात कॉंग्रेससोबत लोक राहतील. तेथे कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल. तेथे भाजपत अस्वस्थता आहे. मोदींनी भरपूर सभा घेतल्या आहेत. मात्र, त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. त्यामुळे त्यांना खालच्या पातळीवर उतरून प्रचार करावा लागला. त्याशिवाय भाजपला तेथे चांगले चेहरे देता आलेले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. 

भाजपचे अनेक लोक पक्ष सोडून जात आहेत. मोदींची भूमिका अनेकांच्या लक्षात आल्याने त्यांना पक्षातून विरोध होत आहे. शत्रुघ्न सिन्हा व यशवंत सिन्हा हे त्याचेच उदाहरण आहे. "मोदी हटाव, देश बचाव' असा या सगळ्यांचा नारा आहे. म्हणून आम्ही त्यांना सोबत घेतले आहे. त्यांच्याकडून भाजपची "अंदर की बात' लोकांपुढे येईल.'' 

Web Title: Country in crisis Chief Minister Prithviraj Chavan criticized the press conference