gotha.jpg
gotha.jpg

गोठा पडून करमाळ्यात गायीचा मृत्यू

करमाळा (सोलापूर) : तालुक्यात बुधवारी महिनाभराच्या विश्रांतीनंतर काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये हिंगणी (ता. करमाळा) येथील एका शेतकर्याचा गोठा पडून गायीचा मृत्यू झाला आहे. दत्तात्रेय बाबर यांची ही गाय आहे.

बुधवारी रात्री पावसामुळे त्यांनी तीन गाई गोठ्यात बांधल्या होत्या. त्यातील एका गाईचा गोठा पडल्याने मृत्यू झाला.
तालुक्यात गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता. यावर्षीही पावसाळा संपत आला तरीही चांगला पाऊस झालेला नाही. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी खरीपाची पेरणी झाली होती. मात्र पुढे पाऊस न आल्याने पिक जळुन गेली आहेत. सध्या रब्बीच्या पेरणीचा कालावधी आहे. त्यात बुधवारी झालेल्या पावसाने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु अजूनही दमदार पावसांची अपेक्षा केली जात आहे. गुरुवारी सकाळपर्यंत तालुक्यात सरासरी १७६ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये करमाळा १७, सालसे ८, कोर्टी ७, केत्तूर १७, उमरड २७, जेऊर ४८, केम ५२ व अर्जुननगर सर्कलमध्ये ०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

करमाळा तालुक्याच्या काही भागात काल दमदार पाऊस झाला आहे. हिंगणी येथे वीज पडून नुकसान झालेल्या शेतक-याला मदत मिळण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला जाईल. - समीर माने, तहसीलदार, करमाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com