Cow Milk : गायीच्या दूध दराचे समीकरण बदलले; प्रति लिटर मिनरल वॉटर पेक्षाही दर कमीच

वाढलेले पशुखाद्याचे दर आणि चाराटंचाईमुळे दुध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे.
Cow
Cowsakal

किल्लेमच्छिंद्रगड - वाढलेले पशुखाद्याचे दर आणि चाराटंचाईमुळे दुध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. बाजारात मिनरल वॉटर पेक्षाही गायीचे दूध स्वस्त झाल्याने शेतकऱ्याच्या पदरीं शेणाशिवाय हाती काहीच शिल्लक राहीना. भरीस भर म्हणून शासन देत असलेल्या प्रती लिटर पाच रुपये अनुदानाचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

जानेवारीच्या शासन निर्णयानुसार ३.३ फॅट व ८.३ एसएनएफसाठी ५ रुपये प्रतिलिटर अनुदानाचा निर्णय घेण्यात आला. तदनंतर दोन महिन्यानी अनुदानाचा फेरविचार केल्यानंतर ता. १३ मार्चच्या मंत्रीमंडळ बैठकीत ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी ५ रुपये अनुदानासह केवळ २५ रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे ३.५ फॅटच्या आतील दुधास पाण्यापेक्षाही कमी म्हणजेच १८ ते२० रुपये दर मिळणार आहे. तर ४ फॅट दुधासाठी केवळ २६ रुपये ५० पैसे दर मिळणार आहे.

यंदा दुष्काळ सदृश परिस्थिती असतानाही शेतकरी पशुधन वाचविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहे. मार्चच्या मंत्रिमंडळ बैठकीत ३.५ फॅट व ८.५ साठी ३२ रुपये ५० पैसे दर मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु दुध दराबाबतच्या निर्णया संदर्भात राज्याच्या राजकिय गोंधळात राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचे दिसून येते.

गेली सहा महिने दुधाचा दर चर्चेत असताना डझनभर असलेल्या लहानमोठ्या शेतकरी संघटनेच्या एकाही नेत्याने चकार शब्द काढलेला नाही. किंवा रस्त्यावर उतरून आंदोलन केलेले नाही. उस दर आणि एफआरपी या एकाच प्रश्नात शेतकऱ्यांना गुंतवून ठेवून राजकारण केले जात आहे. त्यामुळे भारावलेला शेतकरी उस आंदोलनाच्या चक्रव्युहात फसून दुध दराच्या प्रश्नी गाफील राहिल्याने त्याची फसवणूक झाली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने मे महिना अखेर कोणीही नेता आचार संहितेच्या नावाखाली दुध उत्पादक शेतकऱ्यांना वाली भेटणार नाही. तोपर्यंत दुधाचा कृषकाळ सुरू होवून उत्पादन घटल्याने मागणीत वाढ होवून दुधाचे दर ४ फॅटसाठी ३४ रुपये ५० पैसे होतील. तोपर्यंत उत्पादकांच्या होणाऱ्या लुटीस आणि पशुपालन व्यवसाय परवडेना म्हणून कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गोवंशाच्या हत्येस कारणीभुत कोण? यांचा विचार होणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com