गुन्हेगारांच्या दहशत पसरवण्याच्या पध्दतीत बदल होतोय का ?

Create Gangwar In Sangli Because Of Social Media
Create Gangwar In Sangli Because Of Social Media

सांगली - शहरात चोवीस तासात दोन मुडदे पडले. त्यामुळे शहरात दहशत निर्माण झाली आहे. तरूणांची वाढती गुन्हेगारी पोलिसांचीच नव्हे तर समाजाची डोकेदुखी बनली आहे. त्याचबरोबर गुन्हेगारांची दहशत पसरवण्याच्या पध्दतीही बदलत आहेत. गुन्हेगारी टोळीतील तरूणाई कुठेही बसून फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम, युट्यूब या सोशल मिडियाचा वापर करुन दहशत पसरवत आहे. 

गुन्हेगारांवर आधारीत चित्रपटातील डायलॉग, गाण्यांचा वापर करुन सोशल मीडियावर विरोधी टोळीला डिवचले जात आहे. चिथावणीखोर गाणी आणि डायलॉग असलेले व्हिडिओ शेअर केले जात आहेत. त्यातूनच टोळ्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडून मारामारी आणि खूनच्या घडना घडत आहेत. जिल्ह्यातील सायबर सेल करतंय काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय. 

खूनाच्या खोलात पोलिस जातात का ?

शहरातील भरवस्तीत सायंकाळी महाविद्यालयीन तरूणाचा 'अजब' कारणातून खून झाला. हे कारण खरे की खोटे याच्या खोलात पोलिस जातील का, हा वेगळाच प्रश्‍न आहे. त्याच्या तळाशी मात्र सोशल मिडियातील तरुणांचा वावर, एकमेकांवरची शेरेबाजी निश्‍चितपणे दडलेली आहे. त्यात पाच तरूणांना अटक करण्यात आली आहे. ही सारी मुले 16 ते 22 वयोगटातील आहे. या साऱ्यांचे सोशल मिडियात खाते आहे. ते महागडे मोबाईल वापरतात. त्यांच्या खात्यांवरचा मजकूर अनेकदा दहशत निर्माण करण्याच्या हेतून प्रेरीत असतो, अशी पोलिसांच्या तपासातील माहिती आहे. आरोपींनीही मोबाईलवरून चिडवल्याच्या कारणातून हा खून केल्याची कबुली दिली आहे. 

चोवीस तासात दोन खून

दुसरी घटना कुपवाडमधील. तेथे अहिल्यानगरमध्ये एक पडक्‍या विहिरीत रेकॉर्डवरील गुन्हेगारास मारून टाकण्यात आले. हा खून खुन्नस दिल्याने झाल्याचे स्पष्ट होत आहे. एकूणच चोवीस तासात दोन खून घडले आणि त्यात सोशल मिडियाचा काही ना काही संबंध आला आहे. गेल्या वर्षभरात गुन्हेगारांनी दहशत पसरवण्यासाठी सोशल मिडियाचा वापर केल्याचे चित्र स्पष्ट आहे. शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार जामिनावर बाहेर आल्यानंतर सोशल मिडियाचा वापर अत्यंत आक्रमकपणे करत आहेत. काही गुंड शहरातून तडीपार असले तरी या माध्यमातून दहशत पसरवत आहेत. शहरात विविध छोट्या मोठ्या टोळ्या सक्रीय आहेत. यात प्रामुख्याने एखादा गुंड हद्दीपुरता सिमित असला तर तो सोशल मिडियामुळे गुन्हेगारी विश्वात "डॉन'च्या तालात वावरतोय. त्याच्या डोक्‍यात हवा जातेय. पोलिस दलातील सायबर सेलने अधिक बारकाईने अशा ग्रुवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. गेल्या वर्षभरात कोठेही अशा कारवाई झालेल्या दिसत नाहीत. यामुळे हे गुंड विविध सोशल मिडियावर सुसाट सुटले आहेत. 

कुख्यातांच्या माघारी तरुण, अल्पवयीन मुलांनी टोळी सक्रीय

पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी सांगली जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील रेकार्डवरील गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर मोका, तडीपारीच्या कारवाई केली. त्यामुळे कुख्यात गुंड कारागृहात गेले. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीतही अनेकांवर कारवाई केली. मात्र, या कुख्यातांच्या माघारी तरुण आणि अल्पवयीन मुलांनी टोळी सक्रीय केली आहे. त्यांच्या माध्यमातूनच सोशल मिडियावर टोळ्यांचे अस्तित्व टिकवल्याचे दिसते आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com