शेतकऱ्यांची बाजार समितीबद्दलची विश्वासार्हता वाढली : समाधान आवताडे

हुकूम मुलाणी
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

मंगळवेढा  : दुष्काळसदृष्य तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांसाठी अनेक हिताच्या योजना राहिल्याने शेतकऱ्यांची बाजार समितीबद्दलची विश्वासार्हता वाढली असल्याचे प्रतिपादन दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.
 

मंगळवेढा  : दुष्काळसदृष्य तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांसाठी अनेक हिताच्या योजना राहिल्याने शेतकऱ्यांची बाजार समितीबद्दलची विश्वासार्हता वाढली असल्याचे प्रतिपादन दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी सभापती प्रदीप खांडेकर, दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, संचालक सचिन शिवशरण, लक्ष्मण नरुटे, जि प सदस्य दिलीप चव्हाण, पंचायत समिती सदस्य सूर्यकांत ढोणे, लक्ष्मण मस्के, नगरसेवक रामचंद्र कोंडूभैरी, नगरसेविका रतन पडवळे, निर्मला माने, अनिल बोदाडे, सतीश म्हेत्रे, दीपक माने, चंद्रकांत पडवळे, चंद्रकांत गोडसे, राजाराम कालीबाग, माणिक इंगळे, सत्यजित सुरवसे, अंकुश आवताडे, सुहास पवार, सतीश मोहिते व्यापारी, शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना आवताडे म्हणाले शेतकर्‍यांना गतवर्षी कांद्याला उच्चांकी असा दर मिळाल्याने शेतकर्‍यांना याचा फायदा झाला. द्राक्ष पिकाचे उत्पादन ही मोठ्या प्रमाणात घेतले जाते यामुळे बेदाणेचे सौदे काढण्यासाठी बाजार समितीने प्रयत्न करावेत. समितीच्या आवारातील रस्त्यावर अनेक खड्डे आहेत ही गैरसोय दूर करण्यासाठी येथे लवकरच डांबरीकरणाचे रस्ते तयार होणार आहेत.
 
बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे म्हणाले," शेतकर्‍याच्या हिताचीच कामे व्हावीत हे धोरणातून मी पदभार स्वीकारलेला आहे. बाजार समिती व खरेदी विक्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाणे शेतकर्‍यांसाठी हमीभाव केंद्र सुरू केले यामुळे तूर, मका, हरभरा उत्पादक शेतकर्‍यांना याचा चांगला लाभ मिळाला आहे. बाजार समितीमधील डांबरीकरण रस्त्याच्या प्रस्तावाला तसेच डाळिंब सेल हॉलच्या प्रस्तावाला ही मंजूरी मिळाल्याने हे काम लवकरच मार्गी लागेल.
 
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख येताळा भगत, राजाराम कालीबाग, प्रभाकर घुले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. १० प्रती किलो प्रमाणे दामाजी कारखान्याच्या सभासदांना साखर देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांचा सत्कार बाजार समितीच्या व व्यापारी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The credibility of farmers has been increased towards market committee