खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिसासह आठ जणांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

सातारा - कोडोली येथील सम्राट विजय निकम (वय 28 ) याच्या खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विजय दिनकर जाधव याच्यासह आठ जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. काल सायंकाळी चारच्या सुमारास हा खून झाला. रस्त्यात दबा धरून बसलेल्या काही युवकांनी सम्राट वर धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. लोक जमा होताच हल्लेखोर पळून गेले होते.

गुन्हा नोंद झाल्यानंतर सम्राटचा मृतदेह मध्यरात्री ताब्यात घेत त्याच्या पार्थिवावर नातेवाईकांनी माहुली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. 

कोडोली येथे या प्रकरणी तणाव कायम असून, येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संशयितांच्या शोधासाठी पोलिस पथके विविध भागात पाठविण्यात आली आहेत.

Web Title: Crime against eight people, including retired policemen