घरफोडी चेारीचा गुन्हा अवघे दोन तासांत उघडकीस

police
police

मोहोळ, (जि. सोलापूर) : येथील कुंभारखाणी बागवान नगर येथे ३० नोव्हेंबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास झालेल्या घरफोडीचा तपास अवघ्या दोन तासात करून मुद्देमालासह संशईताला पकडण्याची घटना घडली.

पोलिसांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार ३० नोंव्हेबरला पहाटे दोनच्या सुमारास कुंभारखानी, बागवान नगर,मोहोळ येथील राहणारे सेो.शोभा उमाकांत येलगुंडे व प्रमोद भानुदास शिंदे यांचे रहाते घरी अज्ञात चेारटयाने दरवाज्याचा कडी कोयंडा तोडुन घरात प्रवेश करून घरातील कपाट कटवणीने उचकटुन कपाट उघडुन कपाटा मधील अर्धा तोळयाचे सोन्याचे गंठण व रोख सात हजार रूपये व तसेच प्रमोद भानुदास शिंदे यांचे घरातील लोखंडी पेटीतुन पाच हजार रूपये  असे एकूण १२ हजार रोख व सोन्याचे गंठनची  चेारी केली होती.

मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे रात्र गस्त करीत असताना बागवान नगर येथे चोरी झाल्याची माहीती मिळाल्याने त्यांनी तात्काळ तपास पथकांचे व रात्रगस्त करीता असणारे कर्मचारी यांनी एकत्र बोलावुन त्यांना गुन्ह्याचे तपास बाबत मार्गदर्शन करून गुन्ह्यातील आरेापी हे ढोकबाभुळगांव कडे गेले असल्याची संशय असल्याने सर्व पेालीस स्टाफ असे खाजगी वाहनाने जाऊन चार टिम करून ढोकबाभुळगांव येथे रहात असलेल्या संशयीत गुन्हेंगारचे वस्तीवर छापा टाकण्याचे नियोजन केले. छापा टाकण्याचे नियोजना प्रमाणे चार टिम ने सदर वस्तीस घेरावा घालुन पहाटे चारच्या  सुमारास छापा टाकला असता. तेथे एक विधीसंघर्षग्रस्त बालक रा. ढोकबाभुळगांव हा मिळुन आला त्याच वेळी एक इसम व दोन महीला मोटार सायकल वरून पळुन गेले. त्यानंतर पथकांतील काही कर्मचाऱ्यांनी  त्यांचा पठालाग चालु केला व काही कर्मचारी यांनी पळुन गेलेल्या ठिकाणीची विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे सांगणे वरून घरझडती घेतली असता चेारीतील रोख रक्कम साडे तीन हजार रूपये मिळुन आले तसेच बजाज प्लॅटीना किंमत 25000/रूपयाची मिळुन आली. पळुन गेलेल्या संशयीत आरोपी बाबत विचारपुस केली असता त्यांची नांवे बिच्चु उर्फ विशाल गोटुराम काळे व दोन महीला  असे मोटार सायकल वरून पळुन गेल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे बागवान नगर मधील चोरी मध्ये 1) बिच्चु उर्फ विशाल गोटुराम काळे 2) पिप्या गोटुराम काळे 3) गुडया मधुकर पवार   रा.ढोकाबाभुळगांव असे असल्याची माहीती मिळाली.

मोटार सायकल वरून पळुन गेलेल्या बिच्चु उर्फ विशाल गोटुराम काळे व दोन महीला मोटार सायकल वरून पळुन गेले होते त्यांचा शेाध घेण्यास गेलेल्या पथकास अंधाराचा फायदा घेवुन महीलांना सेाडुन सदरचा आरेापी वेगात निघुन गेला. सदर संशयीत महीला दोन आरोपी  बाबत अधिक माहीती घेतली असता त्यांनी सेालापुर शहरातील पेालीस हे आरोपीचे शोध कमी वस्तीवर छापा घालणे साठी दिनांक 11/3/2018 रेाजी आले नंतर आरोपी पळून लावणे करिता आरोपींना मदत करून महिलांनी सरकारी कामात अडथळा  केला होता त्याबाबत मोहोळ पेालीस ठाण्यास भादवि 353 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात वरील दोन महीला आरेापी फरारी होत्या त्यांना सदर गुन्ह्याचे कामी अटक करून दुसरा देखील भादवि 353 चा गुन्हा उघडकीस आणला आहे. एकाच रात्री मोहोळ पेालीस ठाणे चे अधिकारी व कर्मचारी यांनी रात्रीतच आरेापीचा शोध घेवुन दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

सदर कारवाई कामी पेालीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, पेाहेकाॅ/लोभु चव्हाण, पोहेकाॅ/राजु उघडे, पोना/शरद ढावरे, पेाना/विजय माने, पेाकाॅ/गणेश दळवी, पेाना/अभिजित घाटे, पोकाॅ/बाळासाहेब दाढे, पोकाॅ/पवार, पेाकाॅ/अमोल माने, पोकाॅ/महेश कटकधोंड व चालक सिराज पटेल, चालक कुंभार असे लोकांनी शिताफीने व धाडसांने छाप्याचे नियोजन करून छापा घेतला. 

सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणणे कामी मा. मनोज पाटील पोलीस अधिक्षक सोा सोलापुर ग्रामीण, मा.मिलींद मोहीते, अपर पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण व मा.चंद्रकांत खांडवी , उपविभागीय पेालीस अधिकारी सोलापुर ग्रामीण विभाग व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, मोहोळ पेालीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास , पेाना/विजय माने हे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com