esakal | सेल्फी बेतला जीवावर; युवक-युवतीचा नदीत कोसळून दुर्दैवी अंत, गणेशगुडीजवळील घटना

बोलून बातमी शोधा

crime case in belgaum boy and girl dead drawn river in ganeshgudi

दोघेही बेपत्ता असून रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. 

सेल्फी बेतला जीवावर; युवक-युवतीचा नदीत कोसळून दुर्दैवी अंत, गणेशगुडीजवळील घटना
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जोयडा (बेळगाव) : काळी नदीवरील पुलाच्या कठड्याजवळ थांबून सेल्फी काढताना तोल गेल्याने एक युवक व युवती नदीत कोसळल्याची घटना सोमवारी (12) दुपारी अडीचच्या सुमारास गणेशगुडीत (ता. जोयडा) घडली. दोघेही बेपत्ता असून रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, दांडेलीहून एक युवक व युवती पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गणेशगुडीत आले होते. काळी नदीवरील पुलावर ते दोघे सुमारे अर्धा तास बसले होती. त्यानंतर पुलाच्या कठड्याजवळ थांबून दोघेही सेल्फी काढत होते. मात्र, तोल गेल्याने दोघेही पाण्यात कोसळले. याची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक किरण पाटील, जोयडा अग्निशमन दलाचे पथक व स्थानिक राफ्टिंग संघाचे पदाधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. लागलीच शोधमोहीम हाती घेण्यात आली.

हेही वाचा - साहेब, लस आली का हो ? जयसिंगपुरात नागरिकांकडून होतेय विचारणा

अंधार पडल्याने शोध कार्यात अडथळे येऊ लागल्याने मोहीम थांबविण्यात आली. मंगळवारी (ता. 13) सकाळी पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान पाण्यात कोसळलेली युवती बिदर जिल्ह्यातील असून तिचे नाव रक्षिता (वय 22) असल्याचे समजते. ती इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिकत आहे. युवकाचे नाव समजू शकले नाही. घटनेची नोंद रामनगर पोलीस स्थानकात झाली आहे.