esakal | खेळायला गेलेला गौतम परतलाच नाही; विहिरीत बुडून बालकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

खेळायला गेलेला गौतम परतलाच नाही; विहिरीत बुडून बालकाचा मृत्यू

खेळायला गेलेला गौतम परतलाच नाही; विहिरीत बुडून बालकाचा मृत्यू

sakal_logo
By
अमृत वेताळ

बेळगाव : खेळण्यासाठी गेलेल्या दहा वर्षाच्या बालकाचा परसातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार (ता. ३) सकाळी मुचंडी (ता. बेळगाव) येथे उघडकीस आली आहे. गौतम श्रीकांत कोनू (वय १०) असे त्याचे नाव असून घटनेची नोंद मारीहाळ पोलिस स्थानकात झाली आहे.

हेही वाचा: 'सोमय्यांचे ब्लॅकमेलिंग, राणेंच्या ED चौकशीचं पुढं काय?'

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, गौतम चौथीत शिकत होता. काल सायंकाळी चारच्या दरम्यान तो खेळण्यासाठी घरातून बाहेर गेला, तो पुन्हा परतलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. बराच वेळ शोध घेऊनही त्याचा तो सापडला नसल्याने त्यांनी मारिहाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र फिर्याद दाखल केली नाही. संशयाने कुटुंबियांनी आज सकाळी सातच्या सुमारास अग्निशमन दलाला पाचारण करून परसातील विहिरीत सकाळी सातच्या सुमारास शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर अर्ध्या तासातच विहीरीमध्ये गौतमचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती समजताच मारीहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

loading image
go to top