सांगली - दुधोंडीत 2 गटांतील वादात तिघांचा खून

वसंतनगर परिसरात पुर्ववैमान्यस्यातून दोन गटात जोरदार राडा झाला.
सांगली - दुधोंडीत 2 गटांतील वादात तिघांचा खून
Updated on

सांगली/कुंडल : दुधोंडी (ता. पलूस) येथील वसंतनगर परिसरात पुर्ववैमान्यस्यातून दोन गटात जोरदार राडा झाला. यात धारधार शस्त्राने तिघांवर हल्ला करण्यात आला असून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पलूस तालुका हादरला. घटनेची नोंद कुंडल पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. धारदार शस्त्राने झालेल्या वारामुळे सनी आत्माराम मोहिते (वय २८), अरविंद बाबूराव साठे (वय ५२), विकास आत्माराम मोहिते (वय ३२ सर्व रा. दुधोंडी) अशा तिघांचा मृत्यू झाला. तसेच संग्राम विकास मोहीते (वय १७), आकाश आत्माराम मोहीते ( २८), दिलीप आनंदा साठे (४२ सर्व रा. दुधोंडी) अशी जखमींची नावे असून सांगली शासकीय रूग्णालयात येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती, दुधोंडी येथे दोन गटात काल रात्री किरकोळ वाद झाला होता. याची कुंडल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. संशयित हल्लेखोर आज दुपारी बाराच्या सुमारास गावात आले. वादाची खोटी तक्रार कुंडल पोलिसांत का दिली या कारणांवरून संशयितांनी वाद घलण्यास सुरूवात केली. संशयित प्रविण विलास मोहीते, अदित्य विलास मोहिते, हिम्मत मधुकर मोहिते, विजय मधूकर मोहिते, किशोर प्रकाश मोहिते, वनिता विलास मोहिते, संगिता मधुकर मोहिते, मधूकर धोंडीराम मोहिते यांचा समावेश होता. शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. वाद टोकाल गेल्यानंतर धारदार शस्रे, लोखंडी पाईप, काठ्या घेत तुम्हाला मस्ती आहे. आता जिवंत सोडणार नाही असे म्हणत बेदम मारहाण केली. यातील सनी मोहिते, अरविंद साठे, विकास मोहिते यांच्या छाती, पोटावर धारदार शस्त्रांचे वर्मी घाव लागल्याने मोठ्या प्रमाणात अतिरक्तस्राव झाला. त्यानंतर संशयितांनी पलायन केले.

सांगली - दुधोंडीत 2 गटांतील वादात तिघांचा खून
RT-PCR विना कर्नाटकात प्रवेश देऊ नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

दरम्यान, तिघांनाही उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अन्य तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, संशयितांनी रात्री उशीरा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते आहे. दुधोंडीतील तिहेरी हत्याकांडमुळे परिसरात हादरला असून पोलिसांचा मोठी फौज गावात तैनात करण्यात आली आहे.

नातेवाईकांचा आक्रोश

मृत झालेल्यांमध्ये दोघा सख्या भावांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांचा आक्रोश शासकीय रुग्णालय परिसरात दिसून आला. याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सांगली - दुधोंडीत 2 गटांतील वादात तिघांचा खून
'केवळ घोषणा देणारे महाविकास आघाडीचे सरकार'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam released water through its spillway gates for the first time this monsoon after the reservoir level increased due to continuous rainfall.
RBI penalty on Sangli District Central Cooperative Bank
Almatti Dam Supreme Court dispute
Shashikala Jolle complaint to Nitin Gadkari
Marathi News Esakal
www.esakal.com