esakal | बेळगावात भाच्यावर मामाने गोळीबार करताच तो झाला पशार अन्....
sakal

बोलून बातमी शोधा

crime cases in belgaum Kakati police  arrested from Kalkhamb

काकती पोलिसांची कामगिरी...

बेळगावात भाच्यावर मामाने गोळीबार करताच तो झाला पशार अन्....

sakal_logo
By
अमृत वेताळ

बेळगाव : खुल्या जागेच्या वादातून भाच्यावर गोळीबार करुन फरारी झालेल्या मामाला रविवार (9) काकती पोलिसांनी कलखांब येथून अटक केली आहे. त्याच्याकडून एसबीबीएल ही सिंगल बॅरलची शेती संरक्षण बंदूक जप्त केली आहे. खाचू मोनिंग तरळे (रा. आंबेवाडी ता.बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे. जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याची रवानगा हिंडलगा कारागृहात करण्यात आली. 

हेही वाचा- पेन्शनधारकांना दिलासा ; शिक्षणमंत्र्यांकडून ही आहे गुडन्यूज -

अमित बाबूराव पावले आणि त्याची पत्नी निता हे दोघे शनिवार (8) दुपारी तीनच्या सुमारास वादग्रस्त खुल्या जागेत थांबले होते. त्यावेळी खाचूने अक्षेप घेत येथे कशाला थांबला आहे. असे म्हणत अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अमितीने त्याला प्रत्यूत्तर दिल्याने रागाच्या भरात खाचूने त्याच्यावर बंदुकीने गोळी झाडली. गोळी अमितच्या खांद्याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

हेही वाचा- त्यासाठी आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षित माणसांची दुसरी फळी आवश्यक ; देवेंद्र फडणवीस -

त्यावेळी संशयिताची पत्नीने अमितच्या पत्नीला काठीने मारहाण केली. गोळीबार केल्यानंतर  संशयिताने घटनास्थळारुन पलायन केले. या प्रकरणी काकती पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेउन संशयिताचा शोध चालविला होता. ग्रामीण उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्‍त के. शिवारेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कलखांब येथून संशयिताला अटक केली.

संपादन - अर्चना बनगे

loading image