कुटुंबीयांचे डोळे कृष्णेकडे; 4 सख्खे भाऊ नदीत बुडाले

कृष्णानदी तुडूंब भरल्याने शोधकार्यात व्यत्यय येत आहे, मात्र शोधकार्य सुरुच आहे
कुटुंबीयांचे डोळे कृष्णेकडे; 4 सख्खे भाऊ नदीत बुडाले

अथणी : गावातील पिराचा उरुस असल्याने घरातील नदीवर धुण्यासाठी गेलेले सख्खे चार भाऊ कृष्णा नदीत (krishna river) बुडाले. अथणी तालुक्यातील (athani tehsil) हळ्याळ येथे सोमवारी (28) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सदाशिव गोपाळ बनसोडे (वय 24), परशराम गोपाळ बनसोडे (वय 36), दरयाप्पा गोपाळ बनसोडे (वय 22) व शंकर गोपाळ बनसोडे (वय 18) अशी बुडालेल्या भावांची नावे आहेत. एनडीआरएफ पथक (NDRF) व पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरु आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, हळ्याळ (hallyala) येथील पिराचा उरुस असल्याने स्वच्छतेचे काम घरोघरी सुरु आहे. त्यामुळे सोमवारी सदाशिवबनसोडे, परशराम बनसोडे, दरयाप्पा बनसोडे, शंकर बनसोडे हे नदीवर धुण्यासाठी गेले होते. सदाशिव बनसोडे हे कृष्णा नदीच्या पाण्यात पाय घसरून पडल्याने सर्वप्रथम बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी परशराम, दरयाप्पा व शंकर हे धावले असता तेही वाहून जावून पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.

कुटुंबीयांचे डोळे कृष्णेकडे; 4 सख्खे भाऊ नदीत बुडाले
देसाई कुटुंब उद्ध्वस्त; वडिलांसह 2 सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू

घटनास्थळी अथणीचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार, पोलिस उपाधिक्षक एस. व्ही. गिरीश, मंडल पोलिस निरीक्षक शंकरगौडा बसगौडर, उपनिरीक्षक कुमार हाडकर यांनी भेट देऊन तात्काळ बचावकार्य सुरु केले. सध्या येडूर येथून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. अथणी अग्निशामक दल, अथणी पोलिस ठाण्याचे कर्मचारी व परिसरातील पोहण्यात तरबेज असलेली मंडळी बुडालेल्या चारही भावांचा शोध घेत आहेत. कृष्णानदी तुडूंब भरल्याने शोधकार्यात व्यत्यय येत आहे. मात्र शोधकार्य सुरुच आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत या भावांचा शोध लागलेला नव्हता. रात्री उशिरापर्यंत त्याच्याबाबत माहिती न मिळाल्यास मंगळवारी शोधकार्य सुरु ठेवले जाणार आहे.

दोघांची लग्ने, दोघे अविवाहीत

बुडालेल्या चार भावापैकी दोघांची लग्ने झाली असून दोघे अविवाहित आहेत. परशराम बनसोडे यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली तर शंकर यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा, मुलगी आहेत. तर सदाशिव व दरयाप्पा हे अविवाहित असल्याचे समजते.

कुटुंबीयांचे डोळे कृष्णेकडे; 4 सख्खे भाऊ नदीत बुडाले
मंत्रिमंडळात का चिकटलाय? निलेश राणेंचा वडेट्टीवार यांना सवाल

कृष्णानदीकडे कुटुंबीयांचे डोळे

बनसोडे कुटुंबीय शेतमजुरीवर उदरनिर्वाह करतात. आपल्या घरातील चौघेजण बुडाल्याने घरातील मंडळी मोठ्या धास्तावले आहेत. बनसोडे कुटुंबात गोपाळ, त्यांच्या पत्नी, सुना व नातवंडे सध्या कृष्णानदीकडे डोळे लावून बसले आहेत. ते बुडालेली मंडळी परत घरी येण्याची प्रतिक्षा करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com