esakal | लॉजमध्ये गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या; बेळगावातील घटना

बोलून बातमी शोधा

लॉजमध्ये गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या; बेळगावातील घटना
लॉजमध्ये गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या; बेळगावातील घटना
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : लॉजमध्ये गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (२६) उघडकीस आली. कपिल विकास पवार (वय २९, रा. भारतनगर चौथा क्रॉस, शहापूर) असे त्याचे नाव आहे. रेल्वेस्थानक रोडवरील लॉजमध्ये ही घटना घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कपिलला दारुचे व्यसन होते. यात त्याच्यावर कर्जही होते. रिक्षा चालवून तो उदरनिर्वाह करत होता. परंतु, सध्या तो आर्थिक तणावाखाली होता. रविवारी रेल्वेस्थानक रोडवरील लॉजमध्ये थांबला होता. याठिकाणी पंख्याला दोरी बांधून त्याने गळफास घेतला. सोमवारी (२६) लॉजमधील कर्मचाऱ्यांनी कपिलला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तपासणी केली असता कपिलने आत्महत्या कल्याचे उघडकीस आले. खडेबाजार पोलिस ठाण्यात याची नोंद आहे.

हेही वाचा: आयर्लंडची कमाल! काटेकोर नियमावलीने कोरोनाला रोखलं