तलावात बुडून दोघांचा मृत्यू; खानापूरातील घटना

सारा गाव हळहळला; एकुलत्या एक असलेल्या मुलांचा बुडून मृत्यू
तलावात बुडून दोघांचा मृत्यू; खानापूरातील घटना

खानापूर (बेळगाव) : मासेमारीसाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाला. खानापूर तालुक्‍यातील हंदूरमध्ये सोमवारी (१२) सायंकाळी ही घटना घडली. सोमनिंग सद्याप्पा घाळी (वय २४) आणि विठ्ठल सुरेश पाटील (वय १९, दोघेही रा. हंदूर, ता. खानापूर) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत नंदगड पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सोमनिंग व विठ्ठल सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास गावाजवळ असलेल्या तलावात मासेमारीसाठी गेले होते, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले. सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांसोबत ग्रामस्थांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. तलावाच्या काठावर त्यांचे चप्पल दिसून आल्याने ते तलावात उतरले असल्याचा संशय आला. त्यानुसार ग्रामस्थांनी तलावात शोध घेतला असता काही अंतरावर दोघांचेही मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती नंदगड पोलिस स्थानकाला देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक यु. एस. आवटी यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. विठ्ठलच्या मागे आई, वडील व दोन बहिणी तर सोमनिंगच्या मागे आई-वडील व बहीण असा परिवार आहे. दोन्ही कुटुंबांतील एकुलत्या मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे. नंदगड पोलिस पुढील तपास

करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com