esakal | सांगलीत महाविद्यालयीन तरुणावर खुनी हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

crime

सांगलीत महाविद्यालयीन तरुणावर खुनी हल्ला

sakal_logo
By
शैलेश पेटकर : सकाळ वृत्तसेवा

सांगली : शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात पुर्वीच्या भांडणातून महाविद्यालयीन तरुणावर चाकूने खुनी हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला असून शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शिवराज राजशेखर बन्ने (वय २०, रा. माहेश्‍वरी पार्क, माधवनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी साद पखाली, आसिफ खान यांच्यासह पाच जणांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. जखमी बन्ने याने फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जखमी शिवराज बन्ने हा माधवनगर येथील माहेश्‍वरी पार्क येथे आईसोबत राहतो. गणपतराव आरवाडे महाविद्यालयात त्याने बारावीचे शिक्षण पुर्ण केले. एक महिन्यापुर्वी संशयित साद पखाली आणि आसिफ खान या दोघांशी त्याचा किरकोळ कारणातून वाद झाला होता. त्या वादाचा राग अद्यापही दोघांच्या मनात कायम होता. दरम्यान, शिवराज मित्रासोबत महाविद्यालयात प्रमाणपत्र आणण्यासाठी सकाळी अकरा वाजता आहे. दुचाकी पार्किंग केल्यानंतर संशयित दोघांसह अन्य तिघे त्याठिकाणी होते. संशयितांनी शिवराज याच्याकडे रागाने बघत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. दोघांचा पुन्हा वाद पेटला. वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी चाकूने वार केले. शिवराज रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयित पसार झाले.

हेही वाचा: सांभाळून! 'RTO'ला चकवा देणं आता शक्य नाही, कारण...

दरम्यान, शिवराज यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी उशीरा त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. संशयितांना रात्री उशीरापर्यंत ताब्यात घेण्यात आले नसल्याचे विश्रामबागचे निरीक्षक के. एस. पुजारी यांनी सांगितले.

loading image
go to top