esakal | सांभाळून! 'RTO'ला चकवा देणं आता शक्य नाही, कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

सांभाळून! 'RTO'ला चकवा देणं आता शक्य नाही, कारण...

कारण, असे करूनही आपण अधिकाऱ्यांना चकवा देऊ शकतो, असे वाटत असेल तर ते दिवस विसरा

सांभाळून! 'RTO'ला चकवा देणं आता शक्य नाही, कारण...

sakal_logo
By
शैलेश पेटकर

सांगली : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कर्मचाऱ्यांना चकवा देऊन बेदरकार वाहने चालवणे, काळ्या फिल्म लावून वाहन फिरवणे, दारू पिवून वाहन चालवणे आता अधिकच महागात पडणार आहे. कारण, असे करूनही आपण अधिकाऱ्यांना चकवा देऊ शकतो, असे वाटत असेल तर ते दिवस विसरा.

महामार्गासह जिल्ह्यातील वाहनांचा वेग व वाहतुकीच्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक इंटरसेप्टर व्हेईकल दाखल झाले आहे. बेदरकार वाहन चालकांना ‘शूट’ करणारी ‘स्पीड गन’, गाड्यांच्या काचेची पारदर्शकता स्पष्ट करणारे ‘टेन्ट मशिन’ आणि ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाईसाठीचे ‘ब्रीद इनॅलायझर’ मशिन अशी अत्याधुनिक यंत्रणा या वाहनात आहे. भरारी पथक नियुक्त करण्यात आले असून जिल्हाभर याची नजर राहणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी दिली.

हेही वाचा: 'भाजप'ला आव्हान 'राष्ट्रवादी'चे; जयंतराव-चंद्रकांतदादा पुन्हा आमने-सामने

वेगाने, मद्यपान करुन, विना हेल्मेट, सीट बेल्टचा वापर न करणे या कारणांमुळे अपघात होतात. यावर लक्ष ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी ही अत्याधुनिक वाहने देण्यात आली. राज्यात ७६ वाहने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली. त्यात सांगली जिल्ह्यासाठी एक वाहन देण्यात आले. या वाहनाच्या माध्यमातून चालत्या वाहनाचा वेग कॅमेरात कैद करून वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

वेगाने दुचाकी, मोटार किंवा अन्य वाहन चालवणाऱ्यांच्या गाडीचा वेग आणि गाडीच्या नंबरप्लेटचा फोटो टिपला जाणार आहे. त्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाईल. गाडीमध्ये फिल्मिंगवर कारवाई करण्यासाठीचे टेस्ट मशिन आहे. त्यातून काचेची पारदर्शकता ओळखून नियमबाह्य फिल्मिंगवर कारवाइे केली जाईल. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाईसाठी ‘ब्रीद ऍनालायझर’ मशिनही गाडीत आहे. जिल्ह्यातील महामार्गांसह विविध ठिकाणी भरारी पथकांचा वॉच राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: जलसंपदामंत्री 'करेक्ट कार्यक्रमाच्या' तयारीत

loading image
go to top