वनपाल विनायक पाटीलवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर - रोजगार हमी योजनेतील रोपे संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत (जेएफएम) तयार केल्याचे दाखवून  २ लाख २१ हजार ४०० रुपयांचा अपहारप्रकरणी वनपाल विनायक नाना पाटील (राशिवडे खु, ता. राधानगरी. सध्या शाहूवाडी शासकीय निवास्थान) याच्यावर काल रात्री शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला.

कोल्हापूर - रोजगार हमी योजनेतील रोपे संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत (जेएफएम) तयार केल्याचे दाखवून  २ लाख २१ हजार ४०० रुपयांचा अपहारप्रकरणी वनपाल विनायक नाना पाटील (राशिवडे खु, ता. राधानगरी. सध्या शाहूवाडी शासकीय निवास्थान) याच्यावर काल रात्री शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला.

जिल्हा उपवनसंरक्षक श्री. धुमाळ यांच्या आदेशानुसार मलकापूर वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी हा गुन्हा नोंद केला. ‘सकाळ’ मधून वनविभागातील हा अपहार उजेडात आणला होता. त्यानुसार चौकशी झाली. चौकशीत पाटील दोषी ठरला. त्याच्यावर कलम ४०६, ४०९ व ४२० प्रमाणे गुन्हा नोंद झाला.   

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मौजे मोसम (ता. शाहूवाडी) येथे १ लाख हजार २० वृक्षांची रोपवाटिका तयार केली होती. याच रोपवाटिकेतील रोजगार हमी योजनेत तयार केलेली १५ हजार रोपे संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत (जेएफएम) तयार केल्याचे दाखवून पेंडाखळे येथील वनअधिकाऱ्यांनी संगनमताने लाखो रुपयांवरचे वृत्त ‘सकाळ’मधून प्रसिद्ध केले होते.

चार कोटी वृक्ष लागवडीसाठी सरकार आणि वन विभागाने दिलेला २ लाख २० हजार ९०० रुपयांचा निधी पेंडाखळे वनक्षेत्रपाल, पेंडाखळे वनपाल आणि नांदगाव वनरक्षकांच्या सहीने इतर लोकांच्या खात्यावर वर्ग केल्याचे समोर आले होते. हे सर्व वृत्त सकाळमधून प्रसिद्ध केले होते. त्यानुसार तत्कालीन उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्‍ला यांनी चौकशीचे आदेश दिले. सहायक उपवनसंरक्षक विजय गोसावी यांनी ही चौकशी केली. यात अपहार झाल्याचे निदर्शनास आल्याचा अहवाल राज्याच्या वन सचिवांना दिला. त्यानंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असा सूचना सचिवांनी दिल्या होत्या. ऑगस्टमध्ये पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime on Forester Vinayak Patil