पोलिस असल्याचे सांगून दोघा वृद्धांना लुटले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

सोलापूर : पोलिस असल्याचे सांगून दोघा वृद्धांकडून सोन्याचे दागिने लंपास केले. आज (मंगळवारी) सकाळी साडेनऊ ते साडेअकरा यावेळेत दोन घटना घडल्या. 

सोलापूर : पोलिस असल्याचे सांगून दोघा वृद्धांकडून सोन्याचे दागिने लंपास केले. आज (मंगळवारी) सकाळी साडेनऊ ते साडेअकरा यावेळेत दोन घटना घडल्या. 

पहिली घटना : अर्धांगवायूच्या उपचारासाठी सोलापुरात आलेल्या वृद्धाला पोलिस असल्याचे सांगून लुटण्यात आले. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास डफरीन चौक परिसरातील बालविकास मंदिरसमोरील रस्त्यावर घडली. शिवपुत्रप्पा भिमय्या किणगी (वय 65, आळंद, ता. कलबुर्गी) यांनी फिर्याद दिली आहे. "मी पोलिस आहे, काल एक लफड झालेले आहे. तुमच्या हातातील अंगठी काढून तुमच्या खिशामध्ये ठेवा.' त्याच्या सांगण्याप्रमाणे किणगी यांनी सोन्याचे लॉकेट आणि पैसे रुमालात ठेवले. त्याने रुमालाला गाठ मारून दिली. तो निघून गेल्यावर किणगी यांनी पाहिले असता त्यात फक्त पैसे होते, लॉकेट नव्हते. पोलिस असल्याचे सांगणारा तो व्यक्ती दुचाकीवरून पसार झाला. 

दुसरी घटना : दुसरी घटना मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सम्राट चौक परिसरातील दायमा बिल्डिंगसमोर घडली. टॉवेल विक्रेता रामकुमार बन्सीलाल दरगड (वय 65, रा. सुंदरम अपार्टमेंट, महेश कॉलनीजवळ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. दुचाकीवर आलेल्या एकाने दरगड यांना दुचाकी थांबविण्यास सांगितली. मी पोलिस असून रात्री दंगल झाली आहे. चेकींग चालू आहे. तुमच्याकडे गांजा वगैरे काय आहे का? असे विचारले. तेवढ्यात रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीला थांबवून त्याचीही तपासणी केली. त्यानंतर पुन्हा दरगड यांना तुमच्याजवळचे सोन्याचे दागिने, पैसे काढून रुमालात ठेवा, मी बांधून देतो असे तो म्हणाला. दरगड यांनी गळ्यातील सोनसाखळी, सोन्याची अंगठी, पाच हजार हजारांची रोकड काढून रुमालात ठेवली. गाठ बांधून दिल्यानंतर पोलिस असल्याचे सांगणारा व्यक्ती त्याच्या साथीदारासोबत दुचाकीवर निघून गेला. पोलिस असल्याचा बनाव करणाऱ्यांनी रोकड आणि दागिने असा एकूण 41 हजारांचा ऐवज लंपास केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: crime incident in Solapur