इस्लामपुरात 12 सावकारांवर गुन्हा दाखल: चौघांना अटक

कनिष्ठ अभियंत्यास व्याजाने दिलेल्या २३ लाख रुपयापोटी ९५ लाखाची मागणी करीत त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी संशयित अटकेत.
Crime
CrimeSakal

सांगली : बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास व्याजाने दिलेल्या २३ लाख रुपयापोटी ९५ लाखाची मागणी करीत त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी संशयित हिंदुराव बबन मोरे (वय ३७, रा. कापुसखेड), बालम हनिद जमादार (वय ४०, वाघवाडी), धैर्यशील संताजीराव पाटील (वय ५६, कामेरी), संभाजी शिवाजी पवार (वय ३८, होळकर डेअरी जवळ, इस्लामपूर) या सावकारांना आज न्यायालयाने २७ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनवली आहे.

या चौघा शिवाय संशयित जगन्नाथ किसन चिखले, (रा.नवेखेड), सुजित पाटील ( रा. इस्लामपूर ), ज्ञानदेव जाधव (रा.सातवे ), पवार ( पूर्ण नाव नाही, रा. वाळवा ), यासह सांगली शहरातील तीन व्यापारी, इस्लामपूर येथील एक कापड दुकानदार अशा बारा जणांच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. याबाबत बाजीराव दिनकर पाटील ( वय ५४, रा. रक्तपेढीजवळ,इस्लामपूर ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

Crime
पुणे : ‘स्वच्छ टेक्नॉलॉजी’ स्पर्धेत अर्ज करण्यास मुदतवाढ

सर्व संशयितांनी आपला गट करून अभियंता बाजीराव पाटील यांना ऑक्टोबर २०२०ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सावकारी व्याजाने २२ लाख ९० हजार रुपये दिले होते. संभाजी पवार याच्याकडून ९० हजार रुपये घेतले होते. त्याला व्याजापोटी ७२ हजार ४०० रुपये देऊनही बाजीराव यांच्या टी.टी. अर्जावरती सह्या घेऊन दुचाकी काढून घेतली आहे.

ज्ञानदेव जाधव याला ३ लाखा पोटी १ लाख १४ हजार व्याज दिले. तरीही त्याच्याकडुन आणखी ३ लाख ६० हजाराची मागणी होत होती. त्याने पाटील यांना नोकरी घालवण्याचीही धमकी दिली. संशयित सावकारी गटाच्या टोळीने वारंवार पाटील यांच्या घरी येऊन तर कधी मोबाईल फोन वरून ९५ लाखाची मागणी केली. शिवाय संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली आहे.

Crime
विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जात सुधारणा करण्यासाठी मुदतवाढ : सीईटी सेल

या प्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी चौघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने २७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. इस्लामपूर पोलिसांनी आरोपी संभाजी पवार याच्या कडुन १ लाख ८ हजार १०० रुपये रोख व दिनकर पाटील यांची जबरदसतीने नेलेली मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे.

इतर आरोपींचा शोध सुरु आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण हे तपास करीत आहेत. अशा प्रकारे आणखीन कोणाची सावकारी बाबत कोणाच्या विरुध्द तक्रार असलेस त्यांनी इस्लामपूर पोलीस ठाणेस संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com