

बार्शी : मी बँकेची कर्ज प्रकरणे मंजूर करते,एक लाखास सात हजार रुपये द्यावे लागतील,पाच लाख मंजूर करते ३५ हजार द्या,कर्ज मंजूरीनंतर खात्यावर पैसे जमा होताच दोन टक्के कमिशन द्यावे लागेल असा फंडा वापरुन एका महिलेसह दोघांनी सोलापूर जिल्ह्यातील अनेकांना गंडा घातला असून बार्शी शहर पोलिस ठाण्यात एका महिलेसह तिघाजणां विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सीमा सुभाष भालेराव(रा.शासकीय गोदाम जवळ,उपळाई रोड बार्शी),अण्णाराव सावंत(रा.बाळे,सोलापूर),समाधान केत(रा. पोपळी,ता.मोहोळ)अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संतोष ताटे(रा.तडवळे,ता.बार्शी)यांनी फिर्याद दाखल केली ही घटना १ ऑगस्ट २०२२ ते ९ ऑक्टोबर २०२२ दरम्यान घडली.
पुण्यामध्ये केश कर्तनालय दुकान टाकण्यासाठी ताटे त्यांच्या मित्राच्या दुकानात चर्चा करीत बसले असताना एक महिला लहान मुली समवेत तेथे आली आमची बँक कर्जाची चर्चा सुरु असताना तिने मी तुम्हाला कर्ज मिळवून देते असे सांगत लाखांवरील कमिशन व पैसे खात्यावर जमा होताच टक्केवारीही सांगितली.
त्याप्रमाणे पाच लाख रुपये कर्जासाठी सीमा भालेराव यांना १ ऑगस्ट २०२२ रोजी ५ हजार,२० ऑगस्ट १० हजार,२४ ऑगस्ट १० हजार,१२ सप्टेंबर १० हजार,९ ऑक्टोबर २०२२ रोजी ५०० रुपये अशी रक्कम ३५ हजार ५०० रुपये फोन पेद्वारे दिली.
माझी सर्व आधार,पॅन,मोबाईल क्रमांक अशी व्हाट्स अॅप वरुन कागदपत्रे घेतली भालेराव यांनी तुमचे काम झाले आहे आता आत्माराम सावंत व समाधान केत यांचेशी संपर्क साधा असे सांगितले सावंत व केत यांनी मोहोळ येथील अॅक्सिस बँकेत व सोलापूर येथील आयसीआयसीआय चिंचोली एम आयडीसी बँकेत माझे खाते उघडले.
त्यानंतर पंधरा दिवसांनी पुणे येथे अॅक्सिस बॅंकेत बोलावूून घेऊन फॉर्मवर सह्या घेऊन,अंगठे घेतले त्यावेळी दोन्ही बॅंकेचे पासबुक,चेकबुक,एटीएमकार्ड स्वतःकडे ठेवून घेतले दोघांचा फोन आला १० लाख रुपये मंजूर झाले आहेत.
या प्रक्रिया सुरु असताना पुण्याला मला एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले व सीमकार्ड हरवले आहे परत नवीन द्या असे सांगितले,सीम कार्ड नविन काढले असता अॅक्सिस बँकेतून फोन आला ३० हजार रुपये भरा.
सीमा भालेराव यांना फोन केला असता एक महिना सीमकार्ड बंद ठेवा असे सांगितले त्याचवेळी तिघांनी संगनमत करुन ४६ हजार रुपये बॅंकेतून काढले होते तसेच माझे नावावर क्रेडिट कार्ड काढुन १ लाख ७९ हजार ११९ रुपये ८५ पैसे काढले होते तर अॅक्सिस बँकेच्या खात्यातून ६ हजार ५०० रुपये व आयसीआयसीआय बॅंकेतून ५ हजार रुपये काढले होते.
याबाबत भालेराव यांना फोन केला तर माझे काम मी केले आहे,इतर दोघांना फोन केला तर आमचे कमिशन काढले आहे ते पैसे भरणार आहोत असे सांगितले पण नंतर त्यांचे फोन बंद लागत आहेत.
माझ्या प्रमाणेच नीता सोनवणे(रा.परांडा),रत्नमाला निकाळजे(रा.वाकडी,ता.परांडा),शमा शेख(रा.ढगपिंपरी, ता.परांडा)यांचेसह अन्य जणांची फसवणूक झाली आहे असे फिर्यादीत म्हटले आहे तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.