रेल्वे मध्ये नोकरीचे अमिष; १७ लाखांची फसवणूक

रेल्वे मध्ये नोकरी लावतो म्हणून, रेल्वे विभागाचे बोगस पत्र तयार करून देवून, ट्रेनिंग देऊन १७ लाख रूपयांची फसवणूक
crime news Job lure in railways Fraud of Rs 17 lakh palus
crime news Job lure in railways Fraud of Rs 17 lakh palus sakal

पलूस : रेल्वे मध्ये नोकरी लावतो म्हणून, रेल्वे विभागाचे बोगस पत्र तयार करून देवून, ट्रेनिंग देऊन १७ लाख रूपयांची फसवणूक केल्याची फिर्याद मनोज तुकाराम नलवडे (रा. जखिनवाडी, ता.कराड, जि. सातारा) यांनी पलूस पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पलूस पोलिसांनी चौघाजणांना अटक केली आहे. रेल्वे विभागात नोकरी लावतो म्हणून कलकत्ता, दिल्ली, रांची, लखनौ, पुणे, मुंबई व ईतर ठिकाणी घेऊन जाऊन, ट्रेनिंग देऊन, रेल्वे विभागाचे नोकरीस दाखल होण्याचे बोगस पत्र देऊन, वेळोवेळी रोख स्वरूपात १७ लाख रूपयांची ता. ४ एप्रिल २०१८ ते ता. २९ मार्च २०२१ या कालावधीत फसवणूक केली. अशी फिर्याद मनोज नलवडे यांनी ता. १४ जून रोजी पलूस पोलिस ठाण्यात दिली.

त्यानंतर प्राप्त मोबाईल नंबर वरून पलूस पोलिसांनी सय्यद नूरमहंमद शेख ( वय ३१, रा.सांडगेवाडी, ता.पलूस ) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली. संभाव्य आरोपी हे पोलीसांना गुंगारा देऊन, राहण्याची ठिकाणे बदलत होते. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मौलाना शौकत मुल्ला ( रा. नागठाणे, ता.पलूस ), सय्यद नूरमहंमद शेख ( रा. सांडगेवाडी ता.पलूस ), शाहीन सिकंदर मुलाणी ( रा.पुणदी, ता.पलूस ) व सौरभ श्रावण पाटील ( रा. शिंणापूर, जि.कोल्हापूर ) यांना अटक केली. दरम्यान, महाराष्ट्रासह लखनऊ, दिल्ली, कलकत्ता येथे अशा प्रकारची रेल्वे मध्ये नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणारी टोळी कार्यरत आहे. त्याचा तपास लवकर लागेल. असे पोलिसांनी सांगितले. तपास केलेल्या पथकामध्ये पलूस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या सह महिला पोलिस उपनिरीक्षक राजश्री दुधाळे , सुरेंद्र धुमाळे, ठाणे अंमलदार प्रमोद साखरपे, सायबर पोलिस ठाण्याचे गुंडेवार, नंदकुमार कदम, राकेश भोपळे, दिलिप गोरे, संजय कलुगडे, कुलजित चौगुले यांचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com