तुझे पैसे जमिनीवर पडले आहेत उचलून घे.. 

तुझे पैसे जमिनीवर पडले आहेत उचलून घे.. 

सोलापूर : तुझे पैसे जमिनीवर पडले असल्याचे सांगून कारचालकाचे लक्ष विचलित केले आणि कारमधील बॅग लंपास केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सिद्धेश्‍वर मंदिर पार्किंग परिसरात घडली. याप्रकरणी अनिल मुलगे (वय 60, रा. मुलगे मळा, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. मुलगे हे परिवारासह सिद्धेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यांनी भक्त निवासासमोर असलेल्या पार्किंगमध्ये कार पार्क केली. कारमध्ये ड्रायव्हर सादिक शेख हे बसले होते. यावेळी अनोळखी व्यक्तीने शेख यांना तुझे पैसे जमिनीवर पडले आहेत उचलून घे.. असे सांगितले. यावेळी शेख हे पैस उचलून घेत असताना चोरट्याने कारमध्ये ठेवलेली बॅग लंपास केली. बॅगेमध्ये दोन मोबाईल, आठ हजार 500 रुपयांची रोकड, गॉगल व इतर साहित्य होते. 

हेही वाचा : संघर्ष टाळण्यासाठी टोल नाक्‍यांवर पोलिस बंदोबस्त 

गर्दीत वृद्ध महिलेची सोन्याची माळ लंपास 
धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील 25 हजारांची सोन्याची माळ चोरट्याने पळवली. याप्रकरणी सुमती दिगंबर उपाध्ये (वय 76, रा. कर्णिकनगर, सोलापूर) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास कर्णिकनगर भागातील लिंगराज वल्याळ मैदानामध्ये धार्मिक कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपवून गर्दीतून उपाध्ये या बाहेर पडत होत्या. चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ लंपास केली. 

एसटी बस प्रवासात महिलेचे दागिने चोरले 
एसटी बस प्रवासात महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने तसेच रोकड चोरी झाली. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्या रेल्वे स्थानक परिसरात आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. राजश्री किरण गायकवाड (वय 37, रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. गायकवाड या नातेवाइकांच्या लग्नासाठी आल्या होत्या. वागदरी येथून एसटी बसमधून त्या रेल्वे स्थानक परिसरात आल्या. प्रवासादरम्यान चोरट्याने त्यांची नजर चुकवून त्यांच्या पर्समधील दोन हजार 200 रुपयांची रोकड आणि दागिने असा एकूण 58 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

जरूर वाचा!  - तुम्हालाही आठवेल चहाच्या टपरीवरील चर्चा
 
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 
विजयपूर रोड परिसरातील उत्कर्ष नगरात गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. समाधान प्रकाश मस्के (वय 18) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. समाधान याने राहत्या घरी लोखंडी पाइपला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्याला खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकीत झाली आहे. 
 
चोरट्यांकडून मारहाणीची घटना 
चोरीच्या उद्देशाने आलेल्या चौघांनी तरुणास मारहाण केली. ही घटना शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास दोड्डी तांडा कुंभारी येथे घडली. शिवाजी राठोड (वय 30, रा. कन्हेरवाडी, जि. बीड, सध्या- बरुर, ता. दक्षिण सोलापूर) असे जखमीचे नाव आहे. चार जणांनी चोरी करण्याच्या उद्देशाने लाथाबुक्‍क्‍यांनी शिवाजी यांना मारहाण केल्याचे नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकीत झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com