अल्पवयीन मुलावर हमालाकडून अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime update child Abuse shoot Video in mobile
अल्पवयीन मुलावर हमालाकडून अत्याचार

अल्पवयीन मुलावर हमालाकडून अत्याचार

कारदगा : कारदगा येथील एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलावर हमालाने लैंगिक छळ करत अत्याचार केला. बुधवारी (ता. १३) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पप्पू अप्पासाहेब मिठारे (वय 38) आरोपीचे नाव असून त्यास सदलगा पोलासांच्या ताब्यात देण्यात आले आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी (ता. १२) दुपारी अंगणवाडीला जाणारा शाळकरी मुलगा घरासमोर खेळत होता. त्यास पप्पू मिठारे याने आपल्या घरात बोलावून घेतले. या अल्पवयीन मुलासोबत लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचा आपल्याच मोबाईलमध्ये व्हिडीओ केला.

लहान मुलाला अवघड जागी होत असलेल्या वेदना पाहून पालकांनी त्याची विचारपूस केली. डॉक्‍टरांचा सल्ला घेतला असता या मुलावर लैंगिक अत्याचार झाला असल्याचा प्रकार लक्षात आला. या संदर्भात मुलाच्या वडिलांनी सदलगा पोलिस स्थानकास माहिती कळविली. या मुलाला नुकतेच येथील अंगणवाडी शाळेत ॲडमिशन मिळवले होते. त्याच्यावर या नराधमाने अत्याचार केल्याने संतापलेल्या जमावाने पप्पू मिठारे यास बेदाम चोप देत ग्रामपंचायत कार्यालयात आणून डांबले. सदलगा पोलिसांनी तातडीने धाव घेत या नराधमास ताब्यात घेतले.

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. काही वेळातच जमावाने ग्रामपंचायतीसमोर मोठी गर्दी केली. या क्रूर नराधमास आपल्या स्वाधीन करा, असा आरडा-ओरडा करत संबंधितांना धारेवर धरले.पप्पू मिठारे हा विवाहित असला तरीसुद्धा त्याचा काही वर्षापूर्वी पत्नीशी घटस्फोट झाला आहे. त्यामुळे त्याची पत्नी व कन्या दोघीही काही वर्षापासून माहेरीच राहत असतात. त्यामुळे 38 वर्षीय पप्पू मिठारी हा हमाली काम करत आपल्या घरी एकटाच राहतो. पण त्याने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करत मोठी लाजिरवाणी कृत्य केले आहे. त्यामुळे त्याचा गावासह परिसरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. शिवाय अशा या नराधमाला कठोर शासन व्हायलाच हवे, अशी मागणी ग्रामस्थांसह अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Web Title: Crime Update Child Abuse Shoot Video In Mobile

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top