दारू आणण्यासाठी दिलेल्या रकमेतील उर्वरित रक्कम मागितल्याने तरुणाचा खून

दारू आणण्यासाठी दिलेल्या रकमेतील उर्वरित रक्कम मागितल्याने बिअरच्या बाटलीने हल्ला करून तरुणाचा खून
crime update Murder of young man for asking remaining amount of money paid to bring alcohol belgaum
crime update Murder of young man for asking remaining amount of money paid to bring alcohol belgaumsakal

बेळगाव : दारू आणण्यासाठी दिलेल्या रकमेतील उर्वरित रक्कम मागितल्याने बिअरच्या बाटलीने हल्ला करून खून तरुणाचा खून करण्यात आला आहे. शनिवार (ता. १६) रात्री सत्य साई कॉलनी चौथा क्रॉस येथे ही घटना घडली असून महम्मद दिलपुकार शेख (वय २७ रा. घर. नंबर ४४ सत्य साई कॉलनी वैभवनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांना समजली अधिक माहिती अशी महम्मद हा खासगी काम करत होता. काल रात्री नऊच्या सुमारास तो घरी आल्यानंतर बाहेर जाऊन येतो असे सांगून तो बाहेर गेला होता. महम्मद याने आपल्या गल्लीतील उस्मान लालसाब शेख त्याच्याकडे दारु उघडण्यासाठी ५०० रुपये दिले होते. त्यामुळे २५० रुपयांची दारू घेऊन उस्मान घेऊन आला होता. मात्र, उर्वरित २५० रुपये त्याने महम्मद यांच्याकडे परत केले नाहीत. त्यामुळे त्यांनी उस्मान याच्याकडे उर्वरित २५० रुपये देण्याची मागणी महम्मदने केली. मात्र त्याने उर्वरित रक्कम परत देण्यास नकार देत महम्मदबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली.

त्यानंतर रागाच्या भरात त्याठिकाणी पडलेली बिअरची बाटली घेऊन महम्मदवर वार केला. त्यामुळे रक्तस्राव झाल्याने मोहम्मद बेशुद्ध होऊन खाली कोसळला. काहींनी ही माहिती त्याच्या कुटुंबीयांना समजताच कुटुंबाना दिल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर महम्मदला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. खुनाची माहिती समजताच एपीएमसी पोलीस ठाण्याचे मंजुनाथ हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी देखील भेट घेऊन पाहणी केली. एपीएमसी पोलिसांनी संशयित उस्मानला अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com