तलाठी पदासाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा 

घनश्‍याम नवाथे
Friday, 16 October 2020

सांगली-  बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी राज्यभर खळबळ उडाली असताना तलाठी पदाच्या भरतीमध्ये बनावट क्रीडा प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी उमेदवार काकासाहेब भाऊराव वैद्य (रा. रोहिलगड, ता. अंबड, जि. जालना) याच्याविरूद्ध फसवणूक केल्याबद्दल विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील यांनी ही फिर्याद दिली. 

सांगली-  बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी राज्यभर खळबळ उडाली असताना तलाठी पदाच्या भरतीमध्ये बनावट क्रीडा प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी उमेदवार काकासाहेब भाऊराव वैद्य (रा. रोहिलगड, ता. अंबड, जि. जालना) याच्याविरूद्ध फसवणूक केल्याबद्दल विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील यांनी ही फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 2019 मध्ये राज्यात तलाठी महापदभरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यामध्ये सांगली जिल्ह्यात देखील 45 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. भरती प्रक्रियेनंतर एकुण 42 उमेदवारांची संभाव्य निवड व प्रतिक्षा यादी 20 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. भरतीमध्ये खेळाडू आरक्षणातून उमेदवार काकासाहेब वैद्य याची संभाव्य निवड यादीमध्ये समावेश झाला होता. खेळाडू संवर्गातून भरती होण्यापूर्वी वैद्य याने क्रीडा प्रमाणपत्रे सादर केली होती. परंतू या प्रमाणपत्राची पडताळणी करताना त्यामध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे क्रीडा प्रमाणपत्रे पडताळणी करण्यासाठी क्रीडा उपसंचालक औरंगाबाद व नागपूर यांना पाठवण्यात आली. 
औरंगाबाद व नागपूर विभागाच्या क्रीडा उपसंचालकांनी केलेल्या प्रमाणपत्र पडताळणीत वैद्य याने सादर केलेली प्रमाणपत्रे बनावट असल्याचे आढळले. त्यामुळे औरंगाबाद उपसंचालकांनी 20 जुलै 2020 रोजी नागपूर उपसंचालकांनी 1 सप्टेंबर 2020 रोजी प्रमाणपत्र बनावट असल्याचा अहवाल सांगली जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवला. वैद्य याला दिलेले क्रीडा प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे कळवले. त्यामुळे बनावट प्रमाणपत्र सादर करून खेळाडू आरक्षणाचा लाभ वैद्य याने घेतल्याचे स्पष्ट झाले. शासनाची ही फसवणूक असल्यामुळे वैद्य याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांनी दिले होते. त्यानुसार उपजिल्हाधिकारी कार्यालयातील श्रीधर राजमाने यांनी विश्रामाबाग पोलिस ठाण्यात वैद्य याच्याविरूद्ध फिर्याद दिली. अद्याप वैद्य याला अटक करण्यात आली नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime in Vishrambag police station for giving fake sports certificate for Talathi post