सराईत गुन्हेगार श्रीनिवास संगाला दुसऱ्यांदा स्थानबद्ध 

Solapur
Solapur

सोलापूर : बेकायदा सावकारी व्यवसायातील सराईत गुन्हेगार श्रीनिवास किशोर संगा याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत दुसऱ्यांदा स्थानबद्धची कारवाई करण्यात आली आहे. त्याची तेलंगणातील चेरलापल्ली कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सांगा व त्याच्या साथीदारांच्या त्रासाला कंटाळून मे 2018 मध्ये मोरक्या चित्रपटाचे निर्माते कल्याण पडाल यांनी आत्महत्या केली होती. 

शहरातील जेलरोड, जोडभावी, एमआयडीसी, विजयपूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत श्रीनिवास किशोर संगा (वय 32, रा. विजय नगर, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) याच्यावर गुन्हे दाखल आहेत. संगा हा गेल्या अनेक वर्षापासून त्याच्या साथीदारांसह शास्त्रासह फिरत होता. आर्थिक फायद्यासाठी त्याने दहशत निर्माण केली होती. मृत्यूची भीती घालणे, आत्महत्या करण्यास भाग पाडणे, जबरी चोरी करणे, बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक करणे, अपहरण करणे, विनयभंग करणे यासारखे गंभीर गुन्हे त्याने केले आहेत. 

कर्जदारांकडून तो जबरदस्तीने अवास्तव व्याजासह पैसे वसूल करायचा. मुदतीत पैसे न दिल्यास मौल्यवान दागिने, पैसे, वस्तू जबरदस्तीने घेत होता. त्याने परिसरात दहशत निर्माण केली होती. त्याच्या विरुद्ध 2008 पासून शरीराविषयी व मलाविषय 11 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी 2013 मध्ये त्यास तडीपार करण्यात आले होते. 2016 मध्ये एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धची कारवाई करण्यात आली होती. बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा बेकायदेशीर सावकारी व्यवसाय केला. त्याच्या त्रासाला कंटाळून चित्रपट निर्माते कल्याण पडाल यांनी आत्महत्या केली आहे. 

आयुक्त महादेव तांबडे, पोलिस उपायुक्त मधुकर गायकवाड, तत्कालीन पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, पोलिस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त अभय डोंगरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम अभंगराव, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ गुरव, पोलिस कर्मचारी नवनीत नडगेरी, सुदीप शिंदे, विनायक संगमवार, अक्षय जाधव यांनी ही कारवाई पार पाडली आहे. पोलिस आयुक्त तांबडे यांनी कार्यकाळातील ही चौदावी आणि या वर्षातील आठवी स्थानबद्धची कारवाई आहे. 

आत्महत्येस प्रवृत्त केले 
मे 2018 मध्ये सोलापुरातील चित्रपट निर्माते कल्याण राजमोगली पडाल यांनी श्रीनिवासन संगा व त्याचा साथीदार संतोष बसूदे यांच्याकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. संगा व त्याच्या साथीदारांनी अवास्तव व्याज आकारणी करून कर्जाचे पैसे मागण्यासाठी सतत शारीरिक मानसिक त्रास दिला. जबरदस्तीने धनादेश घेतले. गाळा लिहून घेतला. या त्रासाला कंटाळून पडाल यांनी आत्महत्या केली. 

तेलंगणातही गुन्हे दाखल 
संगा व त्याच्या साथीदारांनी जून 2018 मध्ये हैदराबाद येथील एका व्यक्तीकडून 57 लाख 50 हजार रुपये घेतले होते. ती रक्कम परत न करता पैसे देण्याच्या देणाऱ्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी तेलंगणातील चैतन्यपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com