श्रावणी सोमवारनिमित्त पांगरीजवळच्या नीलकंठेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पांगरी - बार्शी बालाघाटाच्या पर्वत रांगांच्या पायथ्याशी मराठवाड्याच्या सरहद्दीलगत असलेल्या पांगरीपासून दोन कि. मी. अंतरावर असलेले श्री.क्षेत्र स्वयंभू नीलकंठेश्वर मंदिर हे भाविकाचे अढळ श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यामध्ये मोठा उत्साह साजरा करण्यात येत असतो. त्याचबरोबर गुढी पाडवा, महाशिवरात्री, पोर्णीमा या दिवशी किर्तन, भजनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. पुणे-लातूर रस्त्यालगत मंदिर असल्याने पर्यटकाचे व भाविकांचे सहजासहजी दर्शन घडते.

चिंचोली पासून अर्धा कि.मी.अंतरावरील नीलकंठेश्वर मंदिरात प्रत्येक सोमवारी भाविकांची मोठी रीघ लागलेली असते.त्यात महिला भाविक मोठ्या संख्येने दर्शनास येत असतात.पहाटे चार वाजल्यापासून मंदिरात महापुजा,अभिषेक,मंत्र उच्चाराने परिसरात वातावरण भक्तीमय होते. स्वयंभू नीलकंठेश्वर मंदिराचे हेमाडपंथी बांधकाम असून गेल्या 40 वर्षापुर्वी लोकवर्गणीतून राजस्थानी कलाकारांकडून अखंड शिलांनी मंदिर बनवून सुबक कलाकृतीचे बनविले आहे.मंदिराच्या समोरील बाजूस सभामंडप असून त्यामध्ये श्रावण महिन्याभरात महिलाकडून पुजा-अर्चा केली जाते.मंदिराच्या परिसरात पर्यटन विकास निधीतून वेळोवेळी मिळत गेलेल्या निधीतून भव्य सभामंडप, यात्री निवास,स्वच्छतागृहे,स्वयंपाक हाॅल,वाहन तळ अशा सुविधा करण्यात आल्या आहेत.मंदिराच्या चोहोबाजूने वावर्या व हाॅलची तटबंदी आहे.मुख्यव्दार नव्याने अत्यंत जुन्या कलाकसुरीने बांधलेले असल्याने आणखीन त्यामध्ये आकर्षकता आला आहे. यामुळे मंदिराच्या सौदर्यात वाढ झाली आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या नीलकंठेश्वर मंदिराच्या लगतच दक्षिणेस पुणे-लातूर राज्यमार्ग असून त्याला लागूनच या बालाघाटाच्या पर्वत रांगामध्ये उगम पावलेली नीलकंठा नदी वाहत असते.या नदीवर जागोजागी बंधारे बांधले असल्याने तुंटूंब पाणी साठल्याचे दिसत आहे.

या मंदिराबाबत आख्यायिका सांगितली जाते. पुर्वी हा परिसर दंडकारण्य म्हणून ओळखला जात होता.प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधार्थ या दंडकारण्यात दाखल झाल्यानंतर त्यांना शिवलिंग पुजेची इच्छा निर्माण झाली. त्यावेळी जमिनीतून शिवलिंग प्रगटले व त्यांची त्यांनी पुजा केली.तेव्हापासून नीलकंठेश्वर मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. 

मंदिराची दक्षिण बाजूच्या दगडी वावर्या अंत्यत जुनाट झाल्या असून त्याठिकाणी नव्याने सभागृह होणे गरजेचे आहे.याकरिता पर्यटन विकास निधीतून यांचे काम मार्ग लागावे असे भाविकामधून भावना व्यक्त होत आहे.
 
Web Title: A crowd of devotees at Nilkantheshwar temple near Pangari