"त्या' प्रकरणी "सीएसआरडी'ला पाच हजारांचा दंड 

CSRD fined five thousand "for that" case
CSRD fined five thousand "for that" case

नगर : जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीच "सीएसआरडी' संस्थेच्या कर्मचाऱ्याला आज पकडले. त्यावर तातडीने कारवाईचा बडगा उगारत जिल्हाधिकाऱ्यांनी सीएसआरडी शिक्षण संस्थेला महापालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या तडाखेबाज कार्यशैलीचा आज आणखी एकदा प्रत्यय आला. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नजीकच जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान आहे. निवासस्थानातून नगर-पुणे रस्त्याकडे नगरनिवासाचा मार्ग येतो. अपर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी यांची सरकारी निवासस्थाने याच ठिकाणी आहेत. परिसराच्या लगतच सीएसआरडी शिक्षण संस्थेचे कार्यालय आहे. 

दंडही केला वसूल 
आज (बुधवारी) सकाळी सव्वादहाच्या सुमारास आपल्या कार्यालयाकडे रवाना होण्यापूर्वी जिल्हाधिकारी द्विवेदी नगरनिवास परिसरात होते. या वेळी नगरनिवास परिसरालगत सार्वजनिक जागेत एका व्यक्तीला कचरा टाकताना जिल्हाधिकाऱ्यांनी पकडले. चौकशी केली असता संबंधित व्यक्ती सीएसआरडी शिक्षण संस्थेची कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे संबंधित शिक्षण संस्थेला सार्वजनिक जागेत कचरा टाकल्याबद्दल पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. संस्थेकडून हा दंड वसूल करण्यात आल्याची माहितीही प्रशासनाकडून मिळाली. 

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई 
शहर स्वच्छ राखण्यासाठी प्रत्येकाकडून सहयोग आवश्‍यक आहे. आपल्या घराप्रमाणे परिसरही स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्वच्छ शहरामुळेच नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहू शकते. याचे भान ठेवून प्रत्येकाने स्वच्छतेचे नियम पाळणे गरजेचे आहे. नियमाचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. तातडीने कारवाई करण्यात येईल. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com