esakal | कोरोना काळात क्षयरोग प्रसाराला लगाम!
sakal

बोलून बातमी शोधा

Paschim maharashtra

कोरोना काळात क्षयरोग प्रसाराला लगाम!

sakal_logo
By
ऱादेराजेंद्र हजारे

निपाणी : कोरोना (Corona) प्रतिबंधासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम घातले गेले. परंतु त्याचा फायदा कोरोनासह इतर आजारांना आळा घालण्यासाठीही झाला. कोरोनाकाळात अनेकांनी मास्कसह (Mask) सुरक्षित अंतर राखल्याने क्षयरोगाचा (TB) प्रसार कमी झाला.

निपाणी, चिक्कोडी तालुक्यात सध्या २१७ क्षयरोग रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील क्षयरोग्यांना केंद्र शासनाच्या निःक्षय पोषण योजनेतून प्रतिमहिना ५०० रुपये अनुदान सकस पोषण आहारासाठी दिले जात आहे. त्यामुळे कोरोना काळात क्षयरोग प्रसाराला लगाम लागला आहे. पूर्वी निपाणी, चिक्कोडी तालुक्यात क्षयरोगाचे प्रमाण अधिक होते. दरम्यान बेळगाव जिल्ह्यांच्या तुलनेत ते जास्तच होते. परंतु कोरोना काळात आवश्यक ती खबरदारी प्रत्येकांकडूनच घेतली गेल्याने या काळात रोगाचा प्रसार पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी औषधोपचारांची काळजी घेतल्याने क्षयरोग बरा होण्याचे प्रमाणही वाढले गेले. क्षयरोग रुग्णांचे निदान करून त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत. जे क्षय रुग्ण उपचार घेत आहेत, त्यांना निःक्षय पोषण योजनेतून दर महिन्याला ५०० रुपये देण्यात येत आहेत.

हेही वाचा: वैभववाडी : तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस

या रुग्णांना औषधे शासनाकडून मोफत दिली जात आहेत. रुग्णांना औषधोपचारासह सकस आहार मिळावा, यासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ रुग्णांना उपचार सुरू असेपर्यंत दिला जात आहे. क्षयरोग अर्थात टीबीच्या रुग्णांना पौष्टिक आणि आरोग्याला लाभदायक आहार घेता यावा यासाठी क्षयरोग कार्यालयाकडून प्रति महिना पोषण आहार भत्ता म्हणून ५०० रुपये दिले जात आहेत. मात्र त्यासाठी रुग्णाचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

हेही वाचा: सोलापूर : सहा महिन्यांत ७२ हजार परवान्यांचे वाटप

२६ महिन्यांत टीबीमुक्त

टीबीच्या रुग्णांचे वेळीच निदान झाले तर तो रुग्ण सहा महिन्यात पूर्णपणे बरा होण्याची शक्यता अधिक आहे. एमडीआर टीबी नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे २६ महिन्यांचा कालावधी लागतो.

'कोरोना काळात क्षयरोग हवेतून पसरण्याचे प्रमाण कमी झाले. कारण अनेकांनी मास्क, सुरक्षित अंतर राखल्याने हवेतून संसर्ग कमी झाला. परिणामी इतर वर्षापेक्षा कोरोना काळात क्षयरोगी कमी आढळले असून ही संख्या केवळ २१७ वर आली आहे.'

-डॉ. व्ही. व्ही. शिंदे,

(तालुका वैद्यकीय अधिकारी, चिक्कोडी)

loading image
go to top