बेदाणा चोरणाऱ्याला उत्तर प्रदेशात अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

कुपवाड - औद्योगिक वसाहतीतील बाफना कोल्ड स्टोअरेजमधील १५ लाखांचा बेदाणा  भरलेला ट्रक बेपत्ता झाला होता. या प्रकरणी आशिष शिवकुमार चतुर्वेदी (वय ३२, मुरली मनोहर मोहल्ला, जालोन, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली. उत्तरप्रदेशातील उरई येथे पोलिसांनी कारवाई केली. 

पोलिसांनी माहिती दिली, की सावळी (ता. मिरज) येथील राम कॅरीग ट्रान्स्पोर्ट मार्फत बाफना स्टोअरेज मधून  ६९५ बेदाणा बॉक्‍स कानपूरला पाठवण्यासाठी ट्रान्स्पोर्ट व्यवस्थापकाने ट्रक चालक कमलजितसिंग याचा ट्रक (एम पी ०७- एच बी ५७६२) भाड्याने ठरवला. बेदाणा भरून २३ सप्टेंबरला ट्रक पाठवण्यात आला. परंतु, तो माल मिळाला नसल्याचे लखनौच्या व्यापाऱ्याने एक ऑक्‍टोबरला ट्रान्स्पोर्ट व्यवस्थापकांना सांगितले.

ट्रक चालक, क्‍लिनर, मालक यांचा संपर्क होऊ शकत नसल्याने मुकेश तसेमसिंग सलारिया (सांगली) यांनी तिघांविरोधात कुपवाड पोलिसांत ५ ऑक्‍टोबरला तक्रार दिली. दरम्यान, संशयित आशिष चतुर्वेदीने ट्रक चालक, क्‍लिनर यांच्याशी संगनमताने १५ लाखांचा बेदाणा लंपास केला होता. कुपवाड पोलिस ठाण्यातील पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने काल उत्तरप्रदेशमधील उरई या ठिकाणी सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचा पाठलाग करून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला आठ दिवस पोलिस कोठडी दिली.

Web Title: Currant Thief arrested in Uttar Pradesh