ऑटोमोबाइलची दुनिया कोटींतून लाखांत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - महिन्याला तीन कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या ऑटोमोबाइलची दुनिया नोटा बंदच्या परिणामामुळे तीन ते पाच लाखांपर्यंत खाली आली आहे. महिन्याला सरासरी सहा-साडेसहा हजार दुचाकींची विक्री होते. मात्र, पाचशे-हजारांच्या नोटा बंद केल्याने विक्री थेट 85-90 टक्‍क्‍यांपर्यंत घटल्याचे ऑटोमोबाइलमधील जाणकार सांगतात. 

कोल्हापूर - महिन्याला तीन कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या ऑटोमोबाइलची दुनिया नोटा बंदच्या परिणामामुळे तीन ते पाच लाखांपर्यंत खाली आली आहे. महिन्याला सरासरी सहा-साडेसहा हजार दुचाकींची विक्री होते. मात्र, पाचशे-हजारांच्या नोटा बंद केल्याने विक्री थेट 85-90 टक्‍क्‍यांपर्यंत घटल्याचे ऑटोमोबाइलमधील जाणकार सांगतात. 

कोल्हापूरकर म्हणजे हौसेला मोल नाही. ज्या ठिकाणी वाहनांच्या क्रमांकावरून त्यांचे मालक ओळखले जातात याच करवीरनगरीत ऑटोमोबाइलची दुनिया थेट कोटींतून लाखांत आली आहे. मार्केटमध्ये पाचशे-हजार रुपयांच्या नोटांचे चलन बंद झाल्यामुळे हा परिणाम झाला आहे. कोणत्याही ऑटोमोबाइल शोरुममध्ये पाचशे-हजारांच्या जुन्या नोटा आजही स्वीकारल्या जात नाहीत. जो व्यवहार आहे तो केवळ डीडी आणि धनादेशावरच सुरू आहे. बॅंकांकडून झालेल्या कर्ज प्रकरणांतीलच व्यवहार सध्या सुरू आहेत. परिणामी ही उलाढाल केवळ 10 टक्केच आहे. 

जिल्ह्यातील कोणताही डीलर पाचशे-हजार रुपयांच्या नोटा स्वीकारत नाही. त्यामुळे अनेक ग्रामीण भागांतील ग्राहकांनी थेट शहरातील मुख्य डीलरकडे धाव घेतली आहे. शहरातही मुख्य डीलर या नोटा स्वीकारत नसल्यामुळे त्यांना धनादेश किंवा डी.डी.चा पर्याय पुढे केला जात आहे. सध्या बॅंकांमध्ये नोटा बदली आणि भरतीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे बॅंकेत तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे. या त्रासामुळे अनेकांनी ऑटोमोबाइलकडील व्यवहार तूर्ततरी थांबविले आहेत. परिणामी ऑटोमोबाइलच्या दुनियेतील व्यवहार थेट दहा टक्‍क्‍यांपर्यंत खाली आले आहेत. पाचशे-हजाराच्या नोटांचा परिणाम थेट ऑटोमोबाइलच्या दुनियेवर मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. 

दृष्टिक्षेपात 

जिल्ह्यात वाहन विक्रीच्या प्रमुख कंपन्यांच्या 

एकाही शोरूममध्ये पाचशे-हजाराच्या नोटांचा स्वीकार नाही 

महिन्याला सरासरी साडेसहा हजार दुचाकींची विक्री होते 

सध्या केवळ 10टक्के दुचाकींची विक्री सुरू 

देखभाल दुरुस्तीवर सुद्धा पन्नास टक्के परिणाम 

पाचशे-हजार रुपयांच्या नोटांचे चलन बंद झाल्यामुळे त्या स्वीकारल्या जात नाहीत. परिणामी ऑटोमोबाइलची दुनिया कोटींतून लाखांत आली आहे. मासिक उलाढाल सुमारे तीन कोटींहून अधिक आहे. मात्र, नोटांचे चलन नसल्यामुळे याची झळ व्यावसायिकांना बसली आहे. सध्या केवळ दहा टक्केच उलाढाल सुरू आहे. रोखीचे व्यवहारच बंद झाले असून केवळ कर्ज प्रकरणातील दुचाकींची विक्री केली जात आहे. 

नितीन गायकवाड (सहायक विक्री अधिकारी, युनिट ऑटो.) 

Web Title: currency affected automobile industry

टॅग्स