"शापित माणसांचे गुपित' प्रथम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

महावितरणच्या कोकण परिक्षेत्रांतर्गत नाट्य स्पर्धेत नगरच्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या "शापित माणसांचे गुपित' या नाटकाने प्रथम क्रमांक पटकाविला.

नगर ः महावितरणच्या कोकण परिक्षेत्रांतर्गत नाट्य स्पर्धेत नगरच्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या "शापित माणसांचे गुपित' या नाटकाने प्रथम क्रमांक पटकाविला. सर्वोत्तम नाटकाच्या पुरस्कारासह विविध पाच पुरस्कारांवरही त्यांनी नाव कोरले. भांडूप परिमंडळाच्या "आय ऍग्री' या नाटकाने द्वितीय क्रमांक मिळविला. कोकण परिक्षेत्राचे सहव्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. 

येथील माऊली सभागृहात पाच नोव्हेंबरपासून ही स्पर्धा सुरू होती. आज या स्पर्धेचा समारोप झाला. या वेळी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी मनोगत व्यक्‍त केले. 
व्यासपीठावर प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अंकुश नाळे, उपमहाव्यवस्थापक अनिल बराटे, सुनील पाठक, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, नाट्य परीक्षक पुरुषोत्तम देशपांडे, रितेश साळुंके डॉ. धनश्री खरवंडीकर, संजय कळमकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर पाटील आणि राजेंद्र धाडगे यांनी केले. अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी आभार मानले. 

स्पर्धेचा निकाल असा ः 
सर्वोत्तम नाटक - प्रथम - शापित माणसांचे गुपित (नाशिक परिमंडळ), द्वितीय - आय ऍग्री (भांडूप परिमंडळ) 
दिग्दर्शन - प्रथम शापित माणसांचे गुपित - रेणुका भिसे, द्वितीय - आय ऍग्री - डॉ. संदीप वंजारी 
अभिनय (स्त्री) - प्रथम - तुने मारी एन्ट्री - लतिका पालव (भांडूप परिमंडळ), द्वितीय - शापित माणसांचे गुपित - रेणुका भिसे (नाशिक परिमंडळ) 
अभिनय (पुरुष) - प्रथम - आय ऍग्री डॉ. संदीप वंजारी (भांडूप परिमंडळ), द्वितीय "अर्जुन की अभिमन्यू' - किशोर साठे (सांघिक कार्यालय, मुंबई) 
नेपथ्य - प्रथम - आय ऍग्री - महेंद्र चुनारकर, द्वितीय - शापित माणसांचे गुपित - राजेंद्र घोरपडे. 
प्रकाश योजना - प्रथम - शापित माणसांचे गुपित - हेमंत पेखळे, द्वितीय - आय ऍग्री - अविनाश शेवाळे 
पार्श्वसंगीत - प्रथम - मुक्ती - चेतन सोनार, द्वितीय - शापित माणसांचे गुपित - नीलेश ठाकूर. 
रंगभूषा वेशभूषा - प्रथम - मुक्ती- मयूर भंगाळे, द्वितीय - अर्जुन की अभिमन्यू - नमिता गजधर. 
बालकलाकार - अर्जुन की अभिमन्यू - भार्गवी शिंदे. शापित माणसांचे गुपित - अनुष्का भिसे व ऋतुजा पिसे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "The Cursed Man's Secret 'First