दोन फुटाने वाढवतील कोयना धरणाचे वक्र दरवाजे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

कोयना धरणाचे आज वक्रद्वारे 33 हजार 879 व धरण पायथा वीज निर्मितीगृहातून दोन हजार 100 असा एकूण 35 हजार 979 क्यूसेक विसर्ग होत आहे. त्यात सायंकाळी वाढ होणार आहे.

कऱ्हाड - कोयना धरणाचे वक्र दरवाजे सायंकाळी दोन फुटाने वाढवण्यात येणार आहेत. धरणातून सायंकाळी 50 हजार 420 क्यूसेक पाणी सोडण्यात येणार आहे.

कोयना धरणाचे आज वक्रद्वारे 33 हजार 879 व धरण पायथा वीज निर्मितीगृहातून दोन हजार 100 असा एकूण 35 हजार 979 क्यूसेक विसर्ग होत आहे. त्यात सायंकाळी वाढ होणार आहे. संध्याकाळी पाचनंतर विसर्गात वाढ करून तो 50 हजार 420 क्यूसेक विसर्ग  करण्यात येईल. वक्र दरवाजे सुमारे दोन फुटांनी वाढवण्यात येणार आहेत. ते सध्या चार फुट आहे. त्यावरून पाच फूट नऊ इंचावर करण्यात येणार आहे.

Web Title: Curve doors of Koyna dam will increase by two feet