संकेश्वरनजीक सिलिंडरचा स्फोट; लाखोंचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन येथील महामार्गावर सोलापूर फाटय़ानजीक शिंदेवाडीत असलेल्या घरासह जनावरांच्या गोठय़ाला आग लागली. त्यात घराचे अडीच लाखाचे तर रोख रक्कम, सोने व संसारपयोगी साहित्य मिळून एकूण साडेपाच लाखांचे नुकसान झाले.

संकेश्वर (जि. बेळगाव) - गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन येथील महामार्गावर सोलापूर फाटय़ानजीक शिंदेवाडीत असलेल्या घरासह जनावरांच्या गोठय़ाला आग लागली. त्यात घराचे अडीच लाखाचे तर रोख रक्कम, सोने व संसारपयोगी साहित्य मिळून एकूण साडेपाच लाखांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी (ता. 22) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. मल्लाप्पा चंदप्पा नाईक, महादेव बयाजी शेंडे अशी नुकसानग्रस्त घर व गोठा मालकांची नावे आहेत.

हे पण वाचा - रेल्वे पुलावरून ट्रक कोसळून दोन जण जागीच ठार 

याबाबत अधिक माहिती अशी, आज (ता. 22) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मल्लाप्पा नाईक यांच्या घरी अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. यावेळी घरात कोणी नसल्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. तसेच महादेव बयाजी शेंडे यांच्या गोठ्याला आग लागली. पण जनावरे बाहेर बांधली असल्यामुळे ती आगीपासून बचावली. घटनास्थळी तहसीलदार ए. आय. कोराणे, उपतहसीलदार रोहित बडचीकर, तलाठी एम. के. कुरी यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून शासनाला अहवाल सादर केला. संकेश्वर अग्निशामक दलाचे प्रमुख एम. बी. मुधोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. घटनास्थळी संकेश्वरचे पोलिस उपनिरीक्षक जी बी. कोगेनहळ्ळी यांनी भेट दिली. 

हे पण वाचा -  पत्नीचा खून करून गेला मासे पकडायला; पण घडले भलतेच  

महादेव शेंडे हे दुधाचा व्यवसाय तर मल्लापा नाईक भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. नाईक यांचे पूर्ण घर जळाले असून आगीत सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व अन्य साहित्य खाक झाले. तर महादेव नाईक यांच्या जनावरांच्या गोठा देखील जळून खाक झाला आहे. सदर दुर्घटना सकाळी दहा वाजता घडली घटनास्थळी पवन पाटील व ग्रामस्थांनी भेट दिली.

हे पण वाचा - वजन वाढविण्यासठी सप्लिमेंटस्‌ खाताय; मग ही बातमी एकदा वाचाच

मोठा अनर्थ टळला
मल्लाप्पा नाईक यांच्या घरी पती, पत्नी व दोन मुलगे वास्तव्यास असतात. सिंलिडरचा स्फोट झाला त्यावेळी सर्व जण कामानिमित्त बाहेर होते. तर महादेव शेंडे यांच्या गोठय़ात पाच जनावरे होती. पण ती दिवसा बाहेर बांधली होती. शेंडे यांचे घर व गोठा लागूनच आहे. त्यांच्या घरी सात जण वास्तव्यास असतात. आग वेळीच आटोक्यात आणल्याने त्यांचे घर बचावून मोठा अनर्थ टळला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cylinder explosion in sankeshwar belgaum